सोलापूर : महिला सशक्तीकरणासाठी महाराष्ट्र शासनाने एक निर्णय घेतला आणि त्या अंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. या योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म भरताना जर चुकला असेल, काही कागदपत्रे अपलोड करायची राहिलेली असतील, चुकीची कागदपत्रे अपलोड केलेली असेल, नाव दुरुस्ती असेल, बँकेचे डिटेल्स चुकीचे टाकलेले असेल, पत्ता चुकीचा भरलेला असेल तर आता चिंता करण्याची गरज नाही. ही सर्व माहिती तुम्ही आता एडिट करू शकता.
advertisement
ऑनलाइन फॉर्म भरतात जर काही चुका झाल्या असतील तर त्या आता तुम्हाला दुरुस्त करता येणार आहे. तुम्ही या सर्व चुका तुम्ही एडिट करू शकता. पण हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण फॉर्म कशा पद्धतीने एडिट करायचा आहे, हेच आपण जाणून घेऊयात.
फॉर्म भरताना चूक झाली तर नेमकं काय कराल?
- सर्वात आधी प्ले स्टोअरवरुन नारीशक्ती दूत ॲप डाऊनलोड करा.
- आधीपासून तुमच्या मोबाईलमध्ये हे ॲप इन्स्टॉल असेल तर ते ॲप अपडेट करुन घ्या.
- ज्या मोबाईल नंबरने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन अर्ज भरला आहे, तोच मोबाईल नंबर टाकून ओटीपीद्वारे व्हेरिफिकेशन करा.
- त्यानंतर ॲप ओपन होईल.
- त्यानंतर यापूर्वी केलेला अर्ज या ऑप्शनवर क्लिक करा.
- क्लिक केल्यानंतर आपण केलेला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज पाहू शकता.
भगर खाण्याचे आहेत भरपूर फायदे, अनेकांना माहिती नसेल, तज्ज्ञांनी काय सांगितलं?
- वर उजव्या बाजूवर एडिट हा ऑप्शन तुम्हाला दिसेल.
- त्या ऑप्शनवर क्लिक करून सर्व माहिती खात्री पूर्वक पुन्हा एकदा भरा.
- पूर्ण केल्यानंतर खाली माहिती अपडेट करा.
- या ऑप्शनवर क्लिक करून फॉर्म सबमिट करायचा आहे. अशाप्रकारे तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म ऑनलाईन पध्दतीने दुरुस्त करू शकतात.