सोलापूर : पैशांची भिशी किंवा दागिन्यांची भिशी आपल्याला ठाऊक आहे. पण सोलापुरात चक्क पुस्तकांची भिशी चालवली जात आहे. पुस्तकांच्या भिशीचा उपक्रम सोलापुरातील जुळे सोलापूर भागात राहणाऱ्या पुस्तक प्रेमी श्रेया कुलकर्णी या महिला चालवत आहेत. दर महिन्याला 100 रुपये भरून महिन्यात 1200 रुपयांची पुस्तके खरेदी करण्याची संधी याद्वारे पुस्तक प्रेमींना मिळणार आहे.
advertisement
श्रेया कुलकर्णी यांनी बारा जणांचा एक ग्रुप तयार केले आहेत. या बारा जणांनी दर महिन्याला प्रत्येकी 100 रुपये जमा करायचे. दर महिन्याच्या दहा तारखेपर्यंत पैसे जमा केल्यानंतर अकरा तारखेला त्या बारा जणातून एक लकी विनर निवडला जाईल. त्याला 1200 रुपयांच्या पुस्तकांची खरेदी करता येईल. पुस्तक भिशी हा उपक्रम पुस्तक प्रेमीसाठी अतिशय चांगला असा ठरणार आहे. या उपक्रमात दर महिन्याला चिठ्ठ्या टाकून लकी विनर निवडला जाईल. त्या लकी विनरला आपल्या आवडीची पुस्तके खरेदी करावी लागतील.
90 वर्षांपासूनची परंपरा, सिद्धरामेश्वर यात्रेत नागफणी बनविण्याचा मान गणेचारी कुटुंबाला, Video
मराठी साहित्याच्या वाचनात आणखी वाढ व्हावी यासाठी 1200 रुपयांची खरेदी करताना मराठी पुस्तकांचीच खरेदी करावी असे बंधन असेल. कोणत्याही प्रकाशनाची मराठी पुस्तके तुम्ही खरेदी करू शकता. प्रत्येक वाचकाला आपल्या आवडीची पुस्तके घ्यायची असतात, पण सर्वसामान्य वाचकांनी कितीही ठरवलं तरी दुकानात जाऊन पुस्तकं घेणं कधी घडत नाही. किंवा काहींची आर्थिक परिस्थिती तशी नसते. याच विचारांतून श्रेया कुलकर्णी यांनी पुस्तक भिशीची कल्पना सुचली.
या पुस्तक भिशीमध्ये 24 सदस्य झाले आहे. पुस्तकांची भिशी ऑनलाईन असल्यामुळे महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातून या भिशीमध्ये वाचक सहभागी होऊ शकतात. या पुस्तक भिशी उपक्रमाचा पुस्तक प्रेमींनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्रेया कुलकर्णी यांनी केले आहे.





