सोलापूर : सोलापूर विभागातून धावणाऱ्या 17317/17318 हुबळी-दादर-हुबळी या एक्स्प्रेसच्या डब्यांमध्ये बदल करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला आहे. आता या गाडीतील जनरल कोच म्हणजेच सामान्य डब्यांची संख्या ही 4 होणार आहे. रेल्वे प्रशासनानं प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
हुबळी-दादर-हुबळी या गाडीला 1 प्रथम श्रेणी वातानुकूलित, 1 द्वितीय श्रेणी वातानुकूलित, 1 तृतीय श्रेणी वातानुकूलित, 7 शयनयान, 3 जनरल, 2 गार्ड ब्रेक वॅन असे एकूण 15 डबे होते. आता या गाडीत 1 द्वितीय श्रेणी वातानुकूलित, 1 तृतीय श्रेणी वातानुकूलित, 7 शयनयान, 4 जनरल आणि 2 गार्ड ब्रेक वॅन असे एकूण 15 डबे असतील. म्हणजेच प्रथम श्रेणी वातानुकूलितचा डबा वगळून तो जनरल करण्यात येईल.
advertisement
हेही वाचा : सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा! रेल्वे 'या' 2 गाड्यांचे डबे वाढवणार
3 जुलैपासून हुबळी-दादर एक्स्प्रेसमध्ये आणि 4 जुलैपासून दादर-हुबळी एक्स्प्रेसमध्ये हे बदल केले जातील अशी माहिती रेल्वे प्रशासनानं दिली. त्यामुळे आता सामान्य डब्यातली गर्दी कमी होण्यास मदत मिळेल आणि प्रवाशांना आरामदायी प्रवास करता येईल अशी आशा आहे.
रेल्वे गाड्यांचे सामान्य डबे गर्दीनं खचाखच भरलेले असतात. प्रवाशांना जागा मिळाली नाही तर या डब्यांच्या शौचालयातूनही प्रवास करण्याची वेळ त्यांच्यावर येते. गाड्यांमधली हीच वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वेनं काही मेल-एक्स्प्रेस गाड्यांमध्ये सामान्य डब्यांची संख्या वाढण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.