TRENDING:

Raksha Bandhan 2025: मूकबधिर विद्यार्थ्यांची कमाल, बनवल्या पर्यावरणपूरक राख्या, सोलापुरमधील शाळेतील उपक्रम, Video

Last Updated:

मूकबधिर विद्यार्थी साइन लँग्वेजच्या माध्यमातून आपल्या हस्तकलेच्या जोरावर सौंदर्यपूर्ण आणि आकर्षक अशा राख्या बनवत आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सोलापूर : राखी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील विकास नगर येथील ममता मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी राखी पौर्णिमेनिमित्त पर्यावरणपूरक राख्या बनवण्याचे काम सुरू केले आहे. मूकबधिर विद्यार्थी साइन लँग्वेजच्या माध्यमातून आपल्या हस्तकलेच्या जोरावर सौंदर्यपूर्ण आणि आकर्षक अशा राख्या बनवत आहेत. या संदर्भात अधिक माहिती शिक्षिका मेधा जोशी यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.
advertisement

ममता मूकबधिर विद्यालयामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून हस्तकलेच्या माध्यमातून राख्या बनवणे तसेच दिवाळीमध्ये आकर्षक आकाश कंदील बनवणे, पणती तयार करणे आणि मूकबधिर विद्यार्थ्यांच्या हस्ते गणपती तयार करणे असे वेगवेगळे उपक्रम या शाळेत राबवले जातात. साइन लँग्वेजच्या माध्यमातून शिक्षक आणि विद्यार्थी राख्या बनवतात.

Lamp Collection : छंद असावा तर असा, ऐतिहासिक आणि विदेशातील 450 दिव्यांचा केला संग्रह, आशा यांची अनोखी कहाणी

advertisement

राखी पौर्णिमा सणाच्या एक महिन्या अगोदरपासून ममता मूकबधिर विद्यालयात राख्या बनवण्याच्या कामाला सुरुवात होते आणि हे राख्या पर्यावरणपूरक असतात. मोतीचे खडे, चमकीचा दोरा, सुती दोरा, फेविकॉल अशा विविध साहित्याचा वापर करून आकर्षक अशा राख्या बनवल्या जातात. तर या उपक्रमामध्ये जवळपास 25 ते 30 विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सहभाग घेतात. तर आतापर्यंत मूकबधिर विद्यार्थ्यांनी जवळपास 100 पेक्षा अधिक पर्यावरणपूरक राख्या बनवल्या असल्याची माहिती शिक्षिका मेधा जोशी यांनी दिली.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर दबावातच, कांदा आणि मक्याची काय स्थिती? चेक करा एका क्लिकवर
सर्व पहा

मूकबधिर विद्यार्थी विद्यार्थिनींना पुढील जीवनात हस्तकलेच्या माध्यमातून व्यवसाय दृष्टिकोन निर्माण करून दिला जात आहे. कोणावरही अवलंबून न राहता मूकबधिर विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपला स्वतःचा व्यवसाय स्वतः सुरू करून स्वतःच्या पायावर उभे राहावे. हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ममता मूकबधिर विद्यालयात विद्यार्थ्यांना हस्तकला शिकवली जात आहे. विद्यार्थी देखील मोठ्या उत्साहात यामध्ये सहभाग नोंदवून आपले कलागुण सादर करत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
Raksha Bandhan 2025: मूकबधिर विद्यार्थ्यांची कमाल, बनवल्या पर्यावरणपूरक राख्या, सोलापुरमधील शाळेतील उपक्रम, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल