TRENDING:

घरातील AC ने घेतला जीव, सोलापूरात विवाहित महिलेचा दुर्दैवी अंत, क्षणात होत्याचं नव्हतं झालं

Last Updated:

सोलापूर शहरातील जुन्या विडी घरकुल परिसरातील गाडगी नगरात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. इथं एका ४० वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रीतम पंडित, प्रतिनिधी सोलापूर: सोलापूर शहरातील जुन्या विडी घरकुल परिसरातील गाडगी नगरात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. इथं एका ४० वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घरातील एअर कंडिशनर (AC) मध्ये स्फोट झाल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
News18
News18
advertisement

पल्लवी प्रवीण सग्गम असे मृत महिलेचे नाव असून ही घटना गुरुवारी घडली. ज्यावेळी ही दुर्घटना घडली त्यावेळी मयत पल्लवी सग्गम घरात बसल्या होत्या. यावेळी अचानक त्यांच्या घरातील एसीचा स्फोट झाला. स्फोटानंतर काही काही कळायच्या आत घरात तत्काळ शॉर्टसर्किट झाले आणि आग वेगाने पसरली. आगीच्या ज्वाळा इतक्या भयंकर होत्या की, त्यांना घरातून बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. आजूबाजूच्या रहिवाशांनी आग लागल्याचे पाहिल्यानंतर आरडाओरडा सुरू केला आणि तत्काळ अग्निशमन दलाला आणि पोलिसांना याची माहिती दिली.

advertisement

अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले, परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता. घरात तपासणी केली असता, पल्लवी सग्गम यांचा मृतदेह पूर्णपणे होरपळलेल्या अवस्थेत आढळून आला.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असून, त्यामागे एसीचा स्फोट हे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
घरातील AC ने घेतला जीव, सोलापूरात विवाहित महिलेचा दुर्दैवी अंत, क्षणात होत्याचं नव्हतं झालं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल