कस्तुरबा मार्केटमध्ये कांदा विक्रीचे काम
मृतदेह यशोदा सुहास सिद्धगणेश हिचा, तर तिच्यावर चाकूने सपासप वार करणाऱ्या पतीचे नाव सुहास तुकाराम सिद्धगणेश आहे. गेल्या आठ महिन्यांपासून यशोदा आणि सुहास विभक्त राहत होते. यशोदा तिची मुलगी सौंदर्यसोबत राहत होती आणि कस्तुरबा मार्केटमध्ये कांदा विक्रीचे काम करून आपला उदरनिर्वाह चालवत होती. मात्र, पती सुहास तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. संशयातून हा भीषण खून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
advertisement
आमच्यात कोणी आला तर सर्वांना संपवीन
दोघांच्या नात्यात सतत वाद निर्माण होत होते. मंगळवारी सकाळी झालेलं भांडण इतकं चिघळलं की, सुहासने संतापाच्या भरात चाकू उचलला आणि पत्नीवर एकामागून एक वार केले. नात्यात सतत वाद निर्माण होत होते. मंगळवारी सकाळी झालेलं भांडण इतकं चिघळलं की, सुहासने संतापाच्या भरात चाकू उचलला आणि पत्नीवर एकामागून एक वार करत होता. आमच्यात कोणी आला तर सर्वांना संपवीन, असं म्हणत पती पत्नी मेल्यानंतर देखील सपासप वार करत होता.
क्रूर हेतूचा तपास सुरू
दरम्यान, सकाळच्या वेळी 8 वाजता थरार नाट्य घडल्याची माहिती आहे. गंभीर जखमी अवस्थेत यशोदा हिला रिक्षातून सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आलं, पण तिचा जीव वाचू शकला नाही. यशोदाची मावशी अन्नपूर्णा भालशंकर यांनी जोडभावी पोलीस ठाण्यात या घटनेची फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सुहास सिद्धगणेश यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, या खुनामागील गूढ आणि त्यामागील क्रूर हेतूचा तपास सुरू आहे.