सोलापूर : सोलापूर शहरातील चिमुकली सृष्टी धानप्पा बिळीअंगडी ही शिवकालीन लाठी फिरवणे या पारंपरिक व ऐतिहासिक खेळाचा विश्वविक्रम करण्यासाठी गेल्या एक वर्षापासून सराव करत आहे. ती सोलापूर शहरातील जूना घरकुल परिसरात राहणारी सृष्टी धानप्पा बिळीअंगडी हिची ही कहाणी आहे. तिचे वय फक्त 13 वर्षे आहे. पण तिने तब्बल 10 तास 10 मिनिटे 10 सेकंद लाठी फिरवून दाखवली आहे.
advertisement
13 वर्षांच्या सृष्टीने आतापर्यंत अनेक राज्यस्तरीय, राष्ट्रीय लाटीकाठीची स्पर्धा आणि त्याचबरोबर कराटे, योंगमुडो स्पर्धा खेळून विशेष प्राविण्य मिळवले आहे. याबाबत तिने लोकल18 शी बोलताना आपल्या या खेळाबाबत सांगितले.
सद्यस्थितीला ती 11 तास सलग लाठी फिरवण्याचा सराव करत आहे. इयत्ता सातवीचा अभ्यासक्रम सांभाळत ती सोलापूरच्या नावलौकिकमध्ये भर घालणाऱ्या विश्वविक्रमाची अत्यंत जोमात तयारी करत आहे. रोज सकाळी 6 ते सकाळी 9 वाजेपर्यंत काठी फिरविण्याचा सराव सृष्टी करत आहे. तर रुद्रशक्ती गुरुकुलचे संस्थापक अध्यक्ष आणि प्रमुख मार्गदर्शक योगीनाथ फुलारी तसेच मुख्य प्रशिक्षक विवेक मिस्कीन हे मार्गदर्शन करत आहेत.
सरकारी शाळेत दिलं जातंय रायफल प्रशिक्षण, पिंपरी चिंचवडमधील अनोखा उपक्रम, काय आहे यामागची संकल्पना?
विश्वविक्रमाबद्दल सृष्टी म्हणते की, महाराष्ट्र हा जिजाऊंच्या लेकी तसेच छत्रपती शिवाजी महाराज व अनेक महापुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. या भूमीतील मुली व महिला सक्षम व्हाव्यात. यासाठी अनेक मुली लाठीकाठी त्याचबरोबर शिवकालीन मर्दानी खेळाकडे आकर्षित व्हावे आणि नवीन पिढी मोबाईलच्या विळख्यातून बाहेर पडावे, असे आवाहन सृष्टीने केले आहे.