दरम्यान, गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणात नवनवीन माहिती समोर येत आहे. पूजा गायकवाडने गोविंद बर्गे यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांची आर्थिक लूट केली होती. तिने बार्शी परिसरात बर्गे यांच्या पैशांतून पावणे दोन गुंठे जमीन घेतल्याची माहिती अलीकडेच समोर आली होती. या जमीन खरेदीखतावर साक्षीदार म्हणून पूजाच्या भावाने सही केल्याचं देखील समोर आलं आहे. आता पूजाने आणखी तीन एकर जमीन बर्गे यांच्या पैशांतून खरेदी केल्याचा संशय व्यक्त केला जातोय.
advertisement
पोलिसांनी पूजाला अटक केल्यानंतर पूजाच्या आणि तिच्या जवळच्या व्यक्तींच्या नावावर असलेल्या संपत्तीबाबत माहिती काढली होती. दरम्यान, तिच्या मावशीच्या नावावर काही दिवसांपूर्वी वैराग परिसरातील तीन एकर जमीन खरेदी केल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. पूजा गायकवाड ही लहानपणापासून आपल्या मावशीकडे राहायला होती. मावशीनेच पूजाला मोठं केलं. तिला जीव लावला. त्यामुळे जीव लावणाऱ्या मावशीसाठी पूजाने गोविंद बर्गेंची आर्थिक लूट केली का? असा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.
मावशीच्या नावावर असलेल्या तीन एकर जमीनीसाठी गोविंद बर्गे यांनी खरंच पैसे दिले होते का? दिले असतील तर ती रक्कम कशी दिली? ऑनलाईन ट्रान्झेक्शन केलं का? याबाबतचे बँकेचे तपशील पोलिसांकडून तपासले जात आहेत. पोलिसांनी या जमिनीच्या मूळ मालकाला बोलवून त्याचीही चौकशी केली आहे. आज दुपारनंतर नर्तिका पूजा गायकवाडला बार्शी न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यानंतर पूजाच्या पोलीस कोठडीत वाढ होणार की तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत होणार? हे आज स्पष्ट होणार आहे. या घटनेचा सविस्तर तपास बार्शी पोलीस करत आहेत.