सोलापूर - सोलापूर शहराच्या मध्यवर्ती भागात पाऊण फूट लांबीची गोगलगाय आढळली आहे. सोलापुरात पहिल्यांदाच इतकी मोठी गोगलगाय आढळल्याने नागरिकांत मोठ्या प्रमाणात याबाबत चर्चा होत आहे. शंख स्वरूपातील ही गोगलगाय 6 इंचाची असून शंखात लपलेले तोंड 3 इंचाचे आहे. या गोगलगायची एकूण लांबी 9 इंच म्हणजेच पाऊण फूट इतकी आहे.
कुठे आढळही ही गोगलगाय -
advertisement
सोलापूर शहरातील दमाणी नगर परिसरातील इंद्रधनू सोसायटीतील नागरिकांना सकाळी ही गोगलगाय आढळली. रस्त्यावर एक शंख असल्याचे नागरिकांना दिसून आले. जवळ जाऊन पाहिले असता ती गोगलगाय असल्याचे स्पष्ट झाले. नागरिकांनी स्पर्श करुन पाहिले असता गोगलगायने आपले शरीर शंखाच्या आत घेतले. यानंतर परिसरात असलेल्या झाडात ही गोगलगाय गेली.
एवढी मोठी गोगलगाय आफ्रिकन जायंट स्नेल या जातीची आहे. ही गोगलगाय बारीक वनस्पती खाते. नर्सरीच्या झाडांची देवाण घेवाण झाली असावी. त्यावेळी ही गोगलगाय झाडांसोबत आली असावी. परदेशातील झाड पुण्यात आले असावे, हे झाड पुण्याहून सोलापुरात आल्याचा अंदाज पर्यावरणतज्ज्ञांनी व्यक्त केला.
Sindhudurg News : परतीच्या पावसाचा भातशेतीला मोठा फटका, पिकं जमिनीदोस्त; डोळ्यात अश्रू आणणारी दृश्य
गोगलगायींच्या एकूण प्रजाती किती -
गोगलगायींच्या सुमारे 35 हजार प्रजाती आहेत. शंखातली गोगलगाय आपले शरीर शंखात आक्रसून घेऊ शकते. जमिनीवर किंवा गोड्या पाण्यात राहणाऱ्या बहुतेक गोगलगायी अंडी घालतात व त्यातून डिंभ अवस्थेतून न जाता प्रौढ प्राणी निर्माण होतात. पाण्यातील गोगलगायी जल-वनस्पती आणि काही वेळा मृत प्राण्यांवर जगतात, अशी माहितीही पर्यावरण तज्ज्ञांनी दिली.