सोलापूर : सोलापूरच्या आदित्य कोडमूर गिनीज वर्ल्ड रिकोर्ड केला आहे. 'एक तासात जास्तीत जास्त पत्ते कलिंगडात रुततील, अशाप्रकारे फेकून मारण्याचा' विश्वविक्रम करत त्याने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. यापूर्वी हा रिकोर्ड चीनच्या व्यक्तीच्या नावावर होता.
आदित्य कोडमूर (रा. अशोक चौक, सोलापूर) असे या तरुणाचे नाव आहे. तो फक्त 19 वर्षांचा आहे. या तरुणाने सर्वाधिक म्हणजे एका मिनिटात 18 कार्ड कलिंगडमध्ये रुततील, असे मारून जागतिक विश्वविक्रम केला आहे. कार्डच्या या जादूगाराकडून सोलापूरकरांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. आदित्यने या आधीच तीन वेळा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मोडला आहे. त्याने इंडियाज गॉट टॅलेंटमध्ये विश्वविक्रम केला असून आता अमेरिका गॉट टॅलेंट, एशिया गॉट टॅलेंटमध्ये सुध्दा विश्वविक्रम केला, अशी माहिती त्याने लोकल18 शी बोलताना दिली.
advertisement
एका मिनिटात 18 कार्ड कलिंगडात रुततील असे फेकून मारण्याच्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड चीनच्या व्यक्तीवर होता. हा रेकॉर्ड आदित्य कोडनूर यांनी तोडला आहे. एका मिनिटात 18 पत्ते मारून आदित्यने जागतिक विश्वविक्रम करत चीनचा रेकोर्ड मोडीत काढला आहे. यानिमित्ताने भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. पत्त्यांसोबत काहीतरी वेगळे करण्याच्या प्रयत्नात आदित्यने हे अनोखे कौशल्य प्रचंड सराव आणि निष्ठेने विकसित केले आहे. भविष्यात जागतिक विश्वविक्रम प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणार असल्याचा विश्वास आदित्यने व्यक्त केला आहे.
सुवर्णपदक विजेत्या कुस्तीपटूवर शेळ्या राखण्याची वेळ, सोलापुरातील धक्कादायक वास्तव
असामान्य प्रतिभेच्या प्रदर्शनाने भारत देश जगभरात आपला ठसा उमटवत आहे. सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील रियालिटी शो- इंडियाज गॉट टॅलेंट हा देशातील वैविध्यपूर्ण प्रतिभेला नवीन संधी उपलब्ध करून देणारा असाच एक मंच मानला जातो. 'विजयी विश्व हुनर हमारा' हे या शोचे यंदाचे ब्रीद असून पहिल्या आठवड्यात स्पर्धकांनी सादर केलेल्या नेत्रदीपक अॅक्टसमुळे आणि त्यांच्या अनोख्या कौशल्याच्या प्रदर्शनामुळे प्रेक्षकांकडून या आंतरराष्ट्रीय फॉरमॅटचे खूप कौतुक होत आहे.
गणपतीची अनोखी मूर्ती, मातीने भाजून केली जाते तयार, लोकांचा प्रचंड प्रतिसाद, पण पुण्यात कुठे मिळते?
या शोच्या यंदाच्या विशेष अशा 10 व्या सत्रात 'कौशल्या'वर प्रकाशझोत असेल आणि प्रत्येक अॅक्टसनंतर कार्यक्रमाचा दर्जा आणि प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावत जातील. या आठवड्याच्या शेवटी प्रेक्षक इतिहास घडताना बघतील. कारण, स्पर्धेतील 6 स्पर्धक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मोडण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहेत.