सोलापूर : शिक्षण पूर्ण केल्यानंतर बहुतांश तरुण जिथे नोकरीच्या शोधात असतात, तिथे एका तरुणाने आपल्या मेहनतीच्या जोरावर स्वतःचा व्यवसाय उभा केला आहे. विशेष म्हणजे अल्पावधीतच आपल्या व्यवसायाने आणि कमाईने या तरुणाने लोकांना चकितही केले आहे. आज जाणून घेऊयात, या तरुणाची प्रेरणादायी कहाणी.
प्रमोद भगत शेळके असे या तरुणाचे नाव आहे. तो सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कामती बुद्रुक येथील रहिवासी आहे. त्याने पेपरपासुन पत्रावळी, नाश्ता प्लेट, द्रोण बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. मागील 3 वर्षापासून प्रमोद हा व्यवसाय करत आहे. या व्यवसायातून महिन्याला 40 ते 50 हजार रुपये कमवत आहे, असे त्याने लोकल18 शी बोलताना सांगितले.
advertisement
राज्यात आज अनेक ठिकाणी होणार जोरदार पाऊस, IMD कडून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं आवाहन
प्रमोद शेळके याने 3 वर्षांपूर्वी सर्वात प्रथम एक लाख रुपयांची मशीन घेऊन पेपर प्लेटमध्ये नाश्ता प्लेट बनवण्याचे काम सुरू केले. नाश्ता प्लेटचा चांगला रिस्पॉन्स मिळाल्याने दुसऱ्या वर्षी दुसरी मशीन घेऊन द्रोण, पत्रावळी बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. द्रोण, पत्रावळी, नाश्ता प्लेट स्वस्त किमतीत मिळत असल्याने नागरिकांकडूनही त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे.
लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायचंय? मग कोल्हापुरात या की..! 12 वर्षांची अनोखी परंपरा, VIDEO
मंगल कार्यालय, घरगुती कार्यक्रम, किरकोळ विक्रेते हे सर्वजण प्रमोद शेळके यांच्याकडून पेपर प्लेट घेऊन जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रमोद शेळके यांनी पेपर प्लेटची मार्केटिंग केले आहे. मोहोळ, कामती, कुरुल आदी गावातून येऊन या ठिकाणाहून पेपर प्लेट घेऊन जात आहे. प्रमोद शेळके पेपर प्लेटच्या माध्यमातून महिन्याला 40 ते 50 हजार रुपये कमवत आहे. तर वर्षाखेपर्यंत तीन ते चार लाखाची कमाई करत आहे. नोकरी न करता व्यवसाय करण्याचा त्याचा हा निर्णय त्याने यशस्वीपणे सिद्ध करुन दाखवला. त्याचा हा प्रवास प्रेरणादायी आहे.