लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायचंय? मग कोल्हापुरात या की..! 12 वर्षांची अनोखी परंपरा, VIDEO

Last Updated:

यंदादेखील गणेशोत्सवात म्हणजेच 7 सप्टेंबरला कोल्हापूरच्या राजाची विधिवत प्राणप्रतिष्ठा झाली. गणेशोत्सवादरम्यान केवळ कोल्हापुरातील नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातून भाविक येथे दर्शन आणि नवसासाठी येतात.

+
कोल्हापूरचा

कोल्हापूरचा राजा

निरंजन कामत, प्रतिनिधी
कोल्हापूर : मुंबईचा लालबागचा राजा हा फक्त राज्यातीलच नव्हे तर देशभरातील लोकप्रिय सार्वजनिक गणेश मंडळ आहे. या राज्याला भक्तांच्या नवसाला पावणाऱ्या बाप्पा अशी विशेष ओळख आहे. यामुळे देशभरातून भाविक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येतात. यामुळे लालबागच्या राजाच दर्शन घेणे, हे इतके सोप नाही.
तासनतास रांगेत उभ राहिल्यानंतर भक्तांना बापाची झलक दिसते. पण कोल्हापुरातही एक असे मंडळ आहे, जे गेल्या 12 वर्षांपासून लालबागच्या राजाच्या रूपातील गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करते आणि त्याची मनोभावे सेवाही करते. विशेष म्हणजे बाप्पाची ही मूर्ती लालबागच्या राजाचे मूळ मूर्तिकार संतोष रत्नाकर कांबळी यांनीच बनवली आहे.
advertisement
कोल्हापूरच्या राजाची कहाणी - 
14 फूट उंच असलेली मूर्ती लालबाग इथे असणाऱ्या गणेश कार्यशाळेत तयार केली जाते आणि तिथून ही मूर्ती कोल्हापुरात मोठ्या थाटामाटात आणली जाते. ढोल-ताशा पथक, विद्युत रोषणाईत गणेशमूर्ती शहरात आणण्यात येते आणि गणेश चतुर्थीला मूर्ती मंडपात विराजमान होते. या बाप्पाला कोल्हापूरकरांनी कोल्हापूरचा राजा अशी उपाधी दिली आहे. कोल्हापूरचा राजा गोल सर्कल मित्र मंडळाचे सदस्य गणेश पाटील यांनी याबाबत माहिती दिली.
advertisement
राज्यात आज अनेक ठिकाणी होणार जोरदार पाऊस, IMD कडून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं आवाहन
यंदादेखील गणेशोत्सवात म्हणजेच 7 सप्टेंबरला कोल्हापूरच्या राजाची विधिवत प्राणप्रतिष्ठा झाली. गणेशोत्सवादरम्यान केवळ कोल्हापुरातील नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातून भाविक येथे दर्शन आणि नवसासाठी येतात. हा नवसाचा गणपती म्हणूनही प्रसिद्ध आहे. या गणपतीचे दर्शन घेतल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात, असा भाविकांचा विश्वास आहे.
advertisement
मंडळामार्फत सामाजिक उपक्रमाचं आयोजन -
हे मंडळ सामाजिक कार्यदेखील राबवत आहे. दरवर्षी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न हे मंडळ करत असते. बाप्पासाठी सुंदर आरास करताना समाजातील गरजूंपर्यंत पोहोचून त्यांना मदत करण्याकडेही या मंडळांचा कल असतो. विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याबरोबरच रक्तदान शिबिरेही हे मंडळ राबवत असते, अशी माहिती मंडळाचे खजिनदार शिवम पोवार यांनी दिली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायचंय? मग कोल्हापुरात या की..! 12 वर्षांची अनोखी परंपरा, VIDEO
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement