150-200 कारागीर, 3 महिन्यांचा कालावधी; मुंबईत बनले गड, किल्ले संवर्धनाचा संदेश देणारे मखर, VIDEO
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Pratikesh Patil
Last Updated:
दिवाळीमध्ये त्यांनी किल्ल्यांचे कंदील तर आता चक्क गड किल्ल्याचे मखर बनवले आहे. त्यांनी गड किल्ल्यांच्या विविध प्रतिकृती बनवल्या आहेत. यामध्ये छोट्या आणि मोठ्या गड किल्ल्यांच्या मखरांचा समावेश आहे.
प्रतिक्षा पाटील, प्रतिनिधी
मुंबई : गणपती बाप्पाच्या आगमनासाठी अवघे काही दिवस बाकी राहिले आहे. गणपती बाप्पाचे अवघ्या काही दिवसांत घराघरांत आगमन होणार आहे. मुंबईतील बाजारपेठाही विविध प्रकारच्या साहित्याने आणि मखरांनी सजल्या आहेत. मात्र, पर्यावरणपूरक कागदी मखर बनवणाऱ्या नानासाहेब शेंडकर यांनी आता मखरातूनही गडकिल्ले संर्वधानाचा संदेश दिला आहे.
गडकिल्ले संवर्धानाचा संदेश देण्यासाठी त्यांनी गडकिल्ल्यांची प्रतिकृती असलेले छोटे-मोठे मखर बनवले आहेत. या मखरांना आता मुंबईकरांकडूनही मोठी पसंती मिळत आहे. महाराष्ट्रातील गड किल्ल्याची अवस्था बघता त्याचे संवर्धन व्हावे, यासाठी नाना शेंडकर आपल्या कलेच्या माध्यमातून पुढाकार घेत आहेत.
advertisement
दिवाळीमध्ये त्यांनी किल्ल्यांचे कंदील तर आता चक्क गड किल्ल्याचे मखर बनवले आहे. त्यांनी गड किल्ल्यांच्या विविध प्रतिकृती बनवल्या आहेत. यामध्ये छोट्या आणि मोठ्या गड किल्ल्यांच्या मखरांचा समावेश आहे. यामध्ये सिंधुदुर्ग किल्ला, रायगड किल्ला याचा समावेश आहे. सगळ्यात महत्त्वाचे असे की, यामध्ये सार्वजनिक आणि घरगुती मखराचा समावेश आहे.
त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी एकूण 100 गड, किल्ले बनवले आहेत. तर घरगुती गणपतीसाठी छोटे 200 मकर बनवले आहेत. हे मखर बोलण्यासाठी तब्बल 3 महिन्यांचा कालावधी लागला आहे. यासाठी 150 ते 200 कारागीर लागले.
advertisement
किती आहे पुठ्ठ्यांच्या मखरांची किंमत -
advertisement
घरगुती छोटे मखर - 250 ते 4500 रुपये - 12 बाय 12 या स्टेटससाठी 19 हजार रुपये
सार्वजनिक मखर- 9 हजार ते 90 हजार रुपये
या पुठ्ठ्यांच्या मखरांना मुंबईकरांची पसंती -
सर्वात महत्त्वाचं म्हणजे नानासाहेब शेंडेकर यांनी गड-किल्ल्यांसोबत, जयपुर पॅलेस, राम मंदिर, सिद्धिविनायक मंदिर यांच्याही प्रतिकृती साकारल्या आहेत. यांना मुंबईकरांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. हे मखर पुठ्ठ्याचे असल्याने हे पर्यावरणपूरकही आहेत. इतकेच नव्हे तर हे मखर पुढच्या वर्षीही वापरता येईल, असे नानासाहेब शेंडेकर यांनी सांगितले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 06, 2024 5:49 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
150-200 कारागीर, 3 महिन्यांचा कालावधी; मुंबईत बनले गड, किल्ले संवर्धनाचा संदेश देणारे मखर, VIDEO