महाराष्ट्रातील अनोखं ठिकाण, जिथं राक्षसिणीची केली जाते पूजा, यात्राही भरते, काय आहे नेमकं कारण?, VIDEO
- Reported by:Kale Narayan
- local18
- Published by:Khushalkant Dusane
Last Updated:
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाच्या सीमेवर असलेल्या पारध गावामध्ये पराशर ऋषींचा देखील प्रभाव राहिला आहे. त्यामुळे पराशर ऋषी आणि हिडींबादेवी अशी दोन्हींच्या नावाने या ठिकाणी यात्रा भरते. ही अनोखी आणि आगळीवेगळी परंपरा नेमकी काय आहे, हे जाणून घेऊयात.
नारायण काळे, प्रतिनिधी
जालना : आपल्या देशात विविध प्रथा परंपरा पाहायला मिळतात. अनेक प्रथा परंपरा या आपल्याला आश्चर्य निर्माण करणाऱ्या किंवा गोंधळात टाकणाऱ्या देखील असतात. जालना जिल्ह्यातील पारध या गावांमध्ये देखील अशीच परंपरा पाहायला मिळते. याठिकाणी चक्क हिडिंबा नावाच्या राक्षसिणीला पूज्य मानले जाते. तसेच हिडिंबादेवीच्या नावाने इथे मोठा उत्सव आणि यात्रादेखील भरते.
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाच्या सीमेवर असलेल्या पारध गावामध्ये पराशर ऋषींचा देखील प्रभाव राहिला आहे. त्यामुळे पराशर ऋषी आणि हिडींबादेवी अशी दोन्हींच्या नावाने या ठिकाणी यात्रा भरते. ही अनोखी आणि आगळीवेगळी परंपरा नेमकी काय आहे, हे जाणून घेऊयात.
advertisement
भोकरदन तालुक्यातील पारध बुद्रुक येथील महर्षी पाराशर ऋषी व हिडिंबा माता यात्रेला प्रारंभ झाला आहे. विशेष म्हणजे या देवतांवर ग्रामस्थांची अपार श्रद्धा आहे. यामुळे सासरी गेलेल्या लेकीबाळी देखील या यात्रेसाठी माहेरी येतात. हा यात्रा उत्सव म्हणजे परिसरातील ग्रामस्थांसाठी एक पर्वणीच आहे. 3 दिवसीय चालणाऱ्या या यात्रेत बुलडाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव आदी जिल्ह्यांमधून भाविक दर्शनासाठी येतात.
advertisement
बुधवारी गावातून हिडिंबा मातेची ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. यात्रेनिमित येथे 2 दिवस कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. बांबू, पाचट वाळलेल्या गवताच्या साहाय्याने मातेची 10 ते 12 फूट उंचीची विक्राळ प्रतिमा तयार करून तिला मुखवटा बसविला जातो. यानंतर खोला साज चढवून तिला बैलगाडीत बसविले जाते. हा मान येथील बारी समाज बांधवांकडे पूर्वीपासूनच आहे.
advertisement
ना तेल ना मसाला, चवीसह आरोग्यसाठीही फायदेशीर, अगदी पटकन तयार होतं हे लोणचं कोणतं?
view commentsपारध शाहूराजा येथील ग्रामस्थ चक्क राक्षसिनीची पूजा करतात. ही काही नवलाची गोष्ट नसली तरी ज्यांना हा इतिहास माहीत नाही, त्यांच्यासाठी आश्चर्याची बाब ठरते, असे संस्थानाचे सचिव समाधान लोखंडे यांनी सांगितले.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
Sep 06, 2024 5:29 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
महाराष्ट्रातील अनोखं ठिकाण, जिथं राक्षसिणीची केली जाते पूजा, यात्राही भरते, काय आहे नेमकं कारण?, VIDEO








