घरात साडे तीनशे किलो वेगवेगळ्या फ्लेवरचे तंबाखूजन्य पदार्थ, नामदेवला पोलिसांनी उचलला

Last Updated:

गोळीबार चौक परिसरात राहणाऱ्या नामदेव तराळे याच्या ठिकाणी वेगवेगळ्या फ्लेवरचे तंबाखूजन्य पदार्थ साठवून ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

नागपूर पोलिसांकडून आरोपीला अटक
नागपूर पोलिसांकडून आरोपीला अटक
उदय तिमांडे, प्रतिनिधी, नागपूर : घरामध्ये ३४१ किलो प्रतिबंधित तंबाखू आणि पान मसाला साठवणूक करणाऱ्या एका आरोपीला तहसील पोलिसांनी अटक करत जवळपास चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. नामदेव तराळे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
गोळीबार चौक परिसरात राहणाऱ्या नामदेव तराळे याच्या ठिकाणी वेगवेगळ्या फ्लेवरचे तंबाखूजन्य पदार्थ साठवून ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे तहसील पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली.
कारवाईदरम्यान प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ मोठ्या प्रमाणात आढळून आले. पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक करत त्याच्या ताब्यातून एकूण चार लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर तंबाखूजन्य पदार्थ कुठून आणले, कोणत्या मार्गाने पुरवठा होत होता आणि यामागे आणखी कोणी आहे का, याचा सखोल तपास तहसील पोलीस करीत आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
घरात साडे तीनशे किलो वेगवेगळ्या फ्लेवरचे तंबाखूजन्य पदार्थ, नामदेवला पोलिसांनी उचलला
Next Article
advertisement
Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

View All
advertisement