IND vs SA : वर्ल्ड कप सिलेक्शन आधी टीम इंडियासमोर शेवटचं चॅलेंज, 24 तास आधी सूर्याने तिघांना बाहेर काढलं!

Last Updated:

भारताविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे.

वर्ल्ड कप सिलेक्शन आधी टीम इंडियासमोर शेवटचं चॅलेंज, 24 तास आधी सूर्याने तिघांना बाहेर काढलं!
वर्ल्ड कप सिलेक्शन आधी टीम इंडियासमोर शेवटचं चॅलेंज, 24 तास आधी सूर्याने तिघांना बाहेर काढलं!
अहमदाबाद : भारताविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात भारतीय टीममध्ये 3 बदल करण्यात आले आहेत. हर्षित राणाच्याऐवजी जसप्रीत बुमराहचं टीम इंडियात कमबॅक झालं आहे, तर कुलदीपऐवजी वॉशिंग्टन सुंदरला संधी देण्यात आली आहे. तर पायाच्या दुखापतीमुळे शुभमन गिल या सामन्यातून बाहेर झाला आहे. गिलऐवजी संजू सॅमसनला संधी देण्यात आली आहे. गिलला लखनऊमधल्या चौथ्या टी-20 सामन्याच्या आदल्या दिवशी प्रॅक्टिस करताना दुखापत झाली होती.
5 टी-20 सामन्याच्या या सीरिजमध्ये टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर आहे. तर लखनऊमधला चौथा टी-20 सामना दाट धुक्यामुळे रद्द करण्यात आला होता. टी-20 वर्ल्ड कपच्या टीमची निवड होण्याआधी टीम इंडियाचा हा शेवटचा सामना आहे. उद्या म्हणजेच शनिवार 20 डिसेंबरला टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय टीमची निवड होणार आहे.
टी-20 वर्ल्ड कपसाठी शुभमन गिलची टीम इंडियात निवड होणार का नाही? याबाबतचा सस्पेन्स निर्माण झाला आहे. मागच्या 18 टी-20 सामन्यात शुभमन गिलला एकही अर्धशतक करता आलेलं नाही, यानंतर आता गिलला दुखापतही झाली आहे. तर दुसरीकडे टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव हादेखील संघर्ष करत आहे. टी-20 वर्ल्ड कपच्या आधी भारतीय टीम न्यूझीलंडविरुद्ध 5 टी-20 मॅचची सीरिज खेळणार आहे. ही सीरिज आणि टी-20 वर्ल्ड कपसाठी एकाच टीमची निवड होण्याची शक्यता आहे. टी-20 वर्ल्ड कपला 7 फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे, तर 8 मार्चला वर्ल्ड कपची फायनल आहे.
advertisement

टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन

अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग

दक्षिण आफ्रिकेची टीम

क्विंटन डिकॉक, रीझा हेन्ड्रिक्स, एडन मार्करम, डेवाल्ड ब्रेविस, डेव्हिड मिलर, डोनोवन फरेरा, जॉर्ज लिन्डे, मार्को यानसन, कॉर्बिन बॉश, लुंगी एनगिडी, ओडनिल बार्टमन
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA : वर्ल्ड कप सिलेक्शन आधी टीम इंडियासमोर शेवटचं चॅलेंज, 24 तास आधी सूर्याने तिघांना बाहेर काढलं!
Next Article
advertisement
Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

View All
advertisement