संतोष देशमुखांच्या हत्येच्या व्हिडीओचे पेनड्राईव्ह वाल्मिक कराडच्या वकिलांकडे, बीडच्या कोर्टात नेमकं घडलं काय?
- Reported by:SURESH JADHAV
- Published by:Prachi Amale
Last Updated:
सुनावणी दरम्यान अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या सुनावणी सुरू असताना सुदर्शन घुले याला चक्कर आली तर कोर्टात आज आरोपीच्या वकिलांना व्हिडिओचे तीन पेन ड्राईव्ह देण्यात आले.
बीड : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज बीडचा विशेष मकोका न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या सुनावणी सुरू असताना सुदर्शन घुले याला चक्कर आली तर कोर्टात आज आरोपीच्या वकिलांना व्हिडिओचे तीन पेन ड्राईव्ह देण्यात आले. संपूर्ण सुनावणी दरम्यान एका लॅपटॉपची चर्चा झाली. चार्ज फ्रेम साठी 23 डिसेंबरची तारीख देण्यात आली आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुढील सुनावणी 23 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. आरोपींच्या वकिलांना व्हिडिओ दिल्यानंतर पाहण्यासाठी आणि पुरावे तपासण्यासाठी वेळ न्यायालयाने दिला आहे. या संदर्भात बोलताना अॅड. बाळासाहेब कोल्हे म्हणाले, आम्ही जास्तीचा पुरावा दिला आहे. त्याबाबतचा एक न्यायालयाचा निकाल दिला. आम्ही कोर्टात दिला आम्हाला तसा जास्तीचा पुरावा सादर करण्यासाठी न्यायालयाची परवानगी घेण्याची आवश्यकता नाही.
advertisement
'त्या' व्हिडीओवर अॅड. बाळासाहेब कोल्हे काय म्हणाले?
आम्ही आरोपीच्या वकिलांना व्हिडिओचा पुरावा दिला आहे. आरोपींच्या वकिलांकडून आम्हाला तो व्हिडिओ पाहायचा आहे ते पाहायचं आहे असं म्हणून वेळकाढूपणा केला गेला. आम्ही त्यामध्ये कुठला पिक्चर टाकलेला नाही त्यामध्ये व्हिडिओ आहेत. तसेच उज्वल निकम यांना बदलण्यासंदर्भात कोर्टाला तसा अधिकार नाही, असेही बाळासाहेब कोल्हे म्हणाले.
advertisement
सुनावणीला पुढची तारीख दिल्यानंतर धनंजय देशमुख काय म्हणाले?
धनंजय देशमुख म्हणाले, 100% यामध्ये वेळकाढूपणा केला जातोय. दोन महिन्यांपासून तेच तेच बोलत आहेत.
येणाऱ्या तारखेला चार्ज फ्रेम व्हावा अशी अपेक्षा आहे. आरोपींना माहिती लिगल काय आहे ते माहिती आहे. ते लढत आहेत त्यामुळे आरोपींनी तसा अर्ज केला आहे. यावर सुध्दा कठोर पाऊल उचलणं न्यायालयाने ठरवावं. कोणाला चक्कर येते ECG व्यवस्थित येतो. हा गुन्हा केलेला आहे तेच आज त्यांच्या डोक्यात आहे. निष्पाप माणसाला मारलेल्याची जाण त्यांना नाही. आणि समर्थन करणारे सुध्दा तेच करत आहेत. क्रृरता ते करत आहेत.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 19, 2025 6:26 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
संतोष देशमुखांच्या हत्येच्या व्हिडीओचे पेनड्राईव्ह वाल्मिक कराडच्या वकिलांकडे, बीडच्या कोर्टात नेमकं घडलं काय?








