घराभोवती लावा आपल्या राशीनुसार झाड, तुमच्यासाठी कोणतं झाडं महत्त्वाचं, VIDEO
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
अभ्यासक हर्षवर्धन कर्णिक यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, आपल्याकडे एकूण 12 राशी आहेत. प्रत्येक राशीचे वेगळे महत्त्व आहे. प्रत्येक राशीचे वेगळे झाडही आहे.
अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : आपल्या राशीचक्रामध्ये एकूण 12 राशी आहेत. प्रत्येक राशीचे वेगवेगळे महत्त्व आहे. तसेच वेगवेगळे कार्यही आहे. या 12 राशीनुसार आपल्या राशीनुसार, कोणते झाड लावणे आपल्यासाठी योग्य आहे, हे झाड लावल्यानंतर त्याचा आपल्याला कसा फायदा होतो, हेच आपण आज जाणून घेऊयात.
अभ्यासक हर्षवर्धन कर्णिक यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, आपल्याकडे एकूण 12 राशी आहेत. प्रत्येक राशीचे वेगळे महत्त्व आहे. प्रत्येक राशीचे वेगळे झाडही आहे.
advertisement
मेष - ज्या लोकांची मेष रास आहे, अशा लोकांनी आपल्या घराच्या परिसरामध्ये आवळ्याचं झाड लावावं. आवळ्याचे झाड आयुर्वेदिकदृष्ट्या खूप महत्त्वाचे आहे आणि मेष राशीच्या लोकांसाठीही खूप महत्त्वाचा आहे.
वृषभ - ज्या लोकांची ऋषभ रास आहे, अशा लोकांनी आपल्या घराच्या अवतीभवती बेलाचे झाड लावावे. भगवान शंकर यांना बेलपत्र अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे बेलाचे झाड लावल्याने त्यांची झपाट्याने प्रगती होते.
advertisement
मिथुन - या राशीच्या लोकांनी आपल्या घराभोवती वडाचे झाड लावावे. हे झाड लावण्याचे निसर्गाला फायदा होतोच पण त्यांना स्वतःही फायदा होतो आणि त्यांची प्रगती वाढते.
कर्क - या राशीच्या लोकांनी आपल्या घराभोवती जास्वंदाचे झाड लावावे. जास्वंदाच्या झाडाचे अनेक फायदे होतात. पण तसेच गणपती बाप्पालाही हे फूल प्रिय आहे. ज्यांच्या घरांमध्ये जास्वंदाचे झाड आहे त्यांना खील खूप फायदा होतो आणि त्यांची प्रगती वाढते.
advertisement
सिंह - या राशीच्या लोकांनी आपल्या घराभोवती गुलाबाचे झाड लावावे. गुलाबाचे झाड सगळ्यांनाच प्रिय असते. त्यांच्या घरात गुलाबाचे झाड आहे, त्यांची प्रगती झपाट्याने होते, असे संशोधनातून समोर आला आहे.
कन्या - या राशीच्या लोकांनी आपल्या घरात चंपाचे झाड लावावे. याचे अनेक फायदे होतात. हे झाड लावल्याने तुमची प्रगती झपाट्याने होते.
advertisement
तूळ - या राशीच्या लोकांनी आपल्या घरामध्ये कडम्माचं झाड लावावे. या झाडाचे त्यांना अनेक फायदे होतात आणि त्यांची प्रगती होते.
वृश्चिक - या राशीच्या लोकांनी आपल्या घरात नाग केशरचे झाड लावावे. हे झाड भगवान शंकराला प्रिय आहे. हे झाड लावल्याने चांगला फायदा होतो.
धनु - या राशीच्या लोकांनी आपल्या घराच्या अवतीभवती जांभळाचे झाड लावावं. हे झाड आयुर्वेदिकदृष्ट्याही खूप महत्त्वाचे आहे. धनु राशीच्या लोकांना याचा खूप फायदा हा होतो.
advertisement
मकर - या राशीच्या लोकांनी आपल्या अवतीभवती पिंपळाचे झाड लावावे. हे झाड शांत झाड समजले जाते. तसेच मकर राशीच्या लोकांच्या अवतीभवती हे झाड असेल तर त्यांची प्रगती होते आणि त्यांचे सर्व कामे होतात.
कुंभ - या राशीच्या लोकांनी आपल्या घराच्या अवतीभवती कडुलिंबाचे झाड लावावं. हे झाड आपल्याला ऑक्सिजन देते. त्याचबरोबर आपली प्रगतीही होते.
advertisement
मीन - या राशीच्या लोकांनी आपल्या घराच्या अवतीभवती एखादे केळीचे झाड लावावे. प्रत्येक शुभ कार्यामध्ये केळीचे पान हे असते. आयुर्वेदिक दृष्ट्याही हे झाड महत्वाचे आहे. हे झाड त्यांच्या अवतीभवती असेल त्यांना फायदा हा होतो, असेही राशी अभ्यासक हर्षवर्धन कर्णिक यांनी सांगितले.
सूचना - ही माहिती राशी अभ्यासकांशी साधलेल्या संवादावर आधारित आहे. याबाबत लोकल18 कोणताही दावा करत नाही.
Location :
Chhatrapati Sambhaji Nagar,Maharashtra
First Published :
September 06, 2024 5:19 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
घराभोवती लावा आपल्या राशीनुसार झाड, तुमच्यासाठी कोणतं झाडं महत्त्वाचं, VIDEO