राज्य निवडणूक आयोगाने 1 जुलै 2025 हा अधिसूचित दिनांक निश्चित केला असून त्या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहे. प्राभगनिहाय प्रारुप मतदार यादी 8 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध केली जाईल. त्यावर 13 ऑक्टोबर 2025 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी 28 ऑक्टोबर 2025 रोजी जाहीर केली जाणार आहे.
advertisement
प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या याबाबत हरकती व सूचना मतदार दाखल करू शकतात.
पहिली निवडणूक कोणती होणार?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत व्हीव्हीपॅटचा वापरही होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच महापालिका, नगरपालिका, पंचायत समिती की जिल्हा परिषद यापैकी पहिली निवडणूक कोणती होणार, याबाबत अद्याप निश्चिती नाही. मनुष्यबळाचा विचार करून टप्प्याटप्प्याने निवडणुका होणार असल्याचे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत व्हीव्हीपॅटचा वापर होणार नाही
देशात राज्य निवडणूक आयोगाच्या अंतर्गत ज्या निवडणुका होतात त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांचा समावेश होता. या निवडणुकांत व्हीव्हीपॅट मशीनचा वापर होत नाही. प्रभा पद्धतीमुळे एकापेक्षा जास्त उमेदवार निवडून द्यायचे असतात. त्यांच्या मतांची मोजणी करावी लागते. त्यामुळे व्हीव्हीपॅटची वापर करता येत नाही. ज्यावेळी मतदारसंघातून एकच उमेदवार निवडून द्यायचा असतो त्यावेळी व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात येतो, असे राज्य निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले. जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर केला तर ही प्रक्रिया अधिकाधिक वेळकाढू असू शकते, असे राज्य निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले