आधार प्रमाणीकरणाचे महत्त्व
शासनाकडून मिळणाऱ्या विविध योजनांचा लाभ फक्त पात्र आणि प्रत्यक्ष विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा, यासाठी आधार प्रमाणीकरण बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांची खरी संख्या व शाळांची अचूक आकडेवारी शासनाकडे उपलब्ध होईल. शिक्षण विभागाच्या माहितीनुसार, जिल्ह्यातील तब्बल 50 हजार विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप झालेले नाही. यापैकी जवळपास 10 हजार विद्यार्थ्यांकडे अद्याप आधार कार्डच उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांची नोंदणी होऊ शकलेली नाही.
advertisement
Agriculture News: शिक्षण फक्त दहावी, बनवले अनोखे जुगाड, बोअरमधून मोटार काढता येणार लगेच
आधार दुरुस्ती कशी करावी?
UIDAIच्या appointments.uidai.gov.in/easearch.aspx या लिंकवर क्लिक करून जवळच्या आधार सेवा केंद्रात जाऊन अपडेट करून घ्यावे. नाव, जन्मतारीख, मोबाइल क्रमांक यामध्ये चूक असल्यास योग्य कागदपत्रांसह बदल करावा. तसेच आधार क्रमांक शाळेच्या नोंदीत नीट तपासून नोंदवावा.
आधार प्रमाणीकरण न झाल्यास विद्यार्थ्यांना शासनाच्या महत्त्वाच्या योजनांचा लाभ मिळणार नाही. यात मोफत पाठ्यपुस्तके, शालेय गणवेश, सायकल वाटप योजना, शिष्यवृत्ती योजना तसेच इतर शैक्षणिक सुविधांचा समावेश आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांचे आधार प्रमाणीकरण तातडीने पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.