पैठणमधील जनआक्रोश मोर्चाला चांगला प्रतिसाद मिळाला. संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे, यासाठी हजारोंनी मोर्चात सहभाग घेतला. सुरेश धस यांनी म्हटले की, परळी शहरातील पोलीस हे आका आणि आकचा वरिष्ठ आका यांचे हप्ते गोळा करतात. परळीमधील हप्त्यांना वैतागून कोरोमंडल सिमेंट कंपनीने गाशा गुंडाळला. आता परळीत टीव्ही मालिकेतील CID आणि सावधान इंडिया मधील पोलिसांची नेमणूक करा असं पत्र मी पोलिसांना देणार असल्याचा टोलाही सुरेश धस यांनी लगावला. यावेळी सुरेश धस यांनी वाल्मिक कराडांवर गैरव्यहाराचे आरोप करताना मालमत्तेचे तपशील दिले. आम्हाला आता आकाचा फासावर जाताना चेहरा पाहायचा असल्याचे सुरेश धस यांनी सांगितले.
advertisement
सुरेश धसांचा बोचरा वार...
लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्त्वात प्रतिमोर्चे निघाले. संतोष देशमुख प्रकरणात सुरेश धस, मनोज जरांगे यांच्याकडून जातीयवाद सुरू असल्याची टीका लक्ष्मण हाके यांनी केली होती. सुरेश धस यांनीदेखील जमीन हडपली असल्याचा सनसनाटी आरोपी हाके यांनी दिला. देशमुख प्रकरणात ओबीसींना लक्ष्य करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला होता.
सुरेश धस यांनी आजच्या भाषणात लक्ष्मण हाकेंचे नाव टाळत टीकास्त्र सोडले. काही प्रीपेड कार्ड पुढारी आहेत. रिचार्ज मारला की सुरू होतात, असे धस यांनी म्हटले. डेला रिसॉर्ट मध्ये कोण-कोणा सोबत मुक्कामाला होतं हे मला माहित आहे, असेही धस यांनी म्हटले. प्रती मोर्चा कढणाऱ्यानो तुम्हाला त्याची पत्नी मुल भाऊ यांच्या डोळ्यातील पाणी दिसत नाही का, असा सवालही धस यांनी केला.
तर आकाच्या आकालाही तुरुंगात जावं लागणार...
सुरेश धस यांनी म्हटले की, वाल्मिक कराड हा 302 चा आरोपी आहे. आता आका वाल्मिक कराड आणि त्याचा आका यांच्यात फोन झाला असेल तर त्या आकाच्या आकालाही तुरुंगात जावं लागणार असल्याचे धस यांनी सांगितले. संभाजी नगर मधील जलील खान याची हत्या झाली. 45 लाखाचं प्रकरण मिटवण्यात आले. इतकं स्वस्त मरण झालं आहे का असा उद्गविन सवाल त्यांनी केला.
