भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धस यांच्याकडून संतोष देशमुख प्रकरणी अनेक गंभीर आरोप केले जात आहेत. सुरेश धस यांनी बीडमधील एका सांस्कृतिक कार्यक्रमाचा उल्लेख करत प्राजक्ता माळीसह इतर काही अभिनेत्रींचीदेखील नावे घेतली. सुरेश धस यांच्या वक्तव्यानंतर प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेत सुरेश धस यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली. तर, धस यांनी त्याला नकार देत आपण आक्षेपार्ह काहीच बोललो नसल्याचा दावा केला होता.
advertisement
चंद्रकांत पाटलांनी खडसावले...
राज्याचे मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील हे कोल्हापूरमध्ये आले होते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी सुरेश धस यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की, आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रीचं चारित्र्य आणि त्यांच्यावर शिंतोडे उडू नये याची नेहमी काळजी घेतली. राजकीय वाद सुरू आहे. यामध्ये काही प्रमाणात सामाजिक आणि संवेदनशील बाबदेखील आहे. पण, यामध्ये अभिनेत्रीचं नाव जोडणं सुरेश धस यांना शोभत नाहीत, असेही सुरेश धस यांनी खडसावले.
सुरेश धस यांनी कोणत्याही महिलेची नाचक्की आणि बदनामी होईल असं बोलता कामा नये. प्राजक्ता माळी यांनी देखील काल प्रेस घेऊन आपल्या भावना व्यक्त केला आहेत. पक्षाचे आमदार असून देखील तुम्ही असं काम करत आहे, असे तुम्ही करू नये
मी सुरेश धस यांना स्वतः विनंती करणार आहे पार्टीचा आमदार असून देखील तुम्ही असं काम करत आहे, हे तुम्ही असं करू नये असे धस यांना सांगणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. आपण सुरेश धस यांना फोन करणार असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
बीड प्रकरणावर सरकार गंभीर
बीडमधील संतोष देशमुख प्रकरणाबाबत सरकार गंभीर असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात 6 दिवसाचं अधिवेशन असून देखील 4 ते 4.30 तासांचा वेळ चर्चेला दिला. यावेळी सगळ्यांनी आपल्या भावना सभागृहात मांडल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेला उत्तर देताना कोणतीही शंका ठेवली नाही. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मुख्यमंत्री फडणवीस हे या प्रकरणात कोणालाही सोडणार नसल्याचा विश्वासही चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.