आमच्यात दररोज संवाद होतो, तसा आज न झाल्याने मी अस्वस्थ झालो. त्यात मुलगा दुपारी न सांगता घराबाहेर पडला. मित्रांसमवेत तो विमानाने परदेशात जात असल्याचे कळाल्याने अस्वस्थेतून मी पोलिसांत तक्रार केली, असे तानाजी सावंत यांनी पत्रकारांना सांगितले.
हट्टापोटी यंत्रणा वेठीस धरली
तानाजी सावंत हे शिवसेनेचे मोठे आणि महत्त्वाचे नेते मानले जातात. त्यांनी याआधी महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्रिपदावर काम करताना अनेक महत्त्वाची खातीही सांभाळली आहेत. पुणे आणि परिसरात त्यांचे आर्थिक साम्राजही मोठे असल्याने त्यांचा दबदबा आहे. त्याचमुळे कौटुंबिक वादातून सगळी माहिती असतानाही केवळ मुलाला जाऊ न देण्याच्या हट्टापोटी यंत्रणा वेठीस धरल्याचे पोलिसांनी खासगीत माध्यम प्रतिनिधींनी सांगितले.
advertisement
पोलिसांचा नाईलाज झाला
माजी मंत्री, बडे नेते तक्रार द्यायला स्वत:पोलीस स्टेशनला आल्याने पोलिसांना लगोलग बाकी कामे बाजूला ठेवून यंत्रणा हलवावी लागली. पोलिसांवर दबाव आणून गुन्हा दाखल करून विमान कंपनीला संबंधित विमान चेन्नईला उतरवून घ्यायला भाग पाडले, असे सांगितले जाते. या सगळ्यावर पोलिसांचा नाईलाज होता.
सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत हा दुपारी दुपारी चार वाजताच्या सुमारास घरातून तडकाफडकी बाहेर पडला. घरामध्ये वाद झाल्यामुळे तो घरातून निघाल्याचे सांगितले जाते.त्यानंतर नेहमीची गाडी न वापरता त्याने दुसरी गाडी घेऊन चालकाला विमानतळावर सोडण्यास सांगितले. यानंतर तो स्पेशल चार्टर फ्लाईटने बँकॉकला निघाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. बजाब एव्हिएशनच्या फाल्कन 2000 एलएक्स नावाच्या खासगी विमानाने ऋषीराज सावंत तीन मित्रांसह बँकॉकला जायला निघाले. तानाजी सावंत यांनी मुलगा हरवल्याची तक्रार दिल्यानंतर आता बँकॉकला जाणारं हे विमान चेन्नईला उतरविण्यात येणार आहे.
तानाजी सावंत पोलिसांना भेटल्यावर काय म्हणाले?
माझा मुलगा बेपत्ता वगैरे नाहीये. दररोज आमच्यात बोलणे होते पण आज दररोजच्या सारखे बोलणे झाली नाही आणि तो घरातूनही बहेर पडल्याने माझी अस्वस्थता वाढली. त्याचा फोनही लागत नव्हता. त्यामुळे मी पोलिसांत पोहोतून तक्रार दिली. काळजीपोटी आम्ही हे पाऊल उचलले. संपर्क झाला नाही म्हणून मी चिंतेत होतो, असे तानाजी सावंत यांनी सांगितले.
काय म्हणाले पोलीस?
'तानाजी सावंत यांचा मुलगा बेपत्ता असल्याची आमच्याकडे तक्रार आली. आम्ही आमची यंत्रणा सक्रीय केली. खासगी विमानाची माहिती मिळाल्यानंतर ते कोठे जात आहे, कोण कोण आहे, याची माहिती आम्ही घेतली. गुन्हे अन्वेषण विभाग अधिक तपास करत आहे', असे पोलिसांनी सांगितले.
