TRENDING:

असा वट पाहिजे... बँकॉकला जाणारं विमान हवेतूनच माघारी फिरवलं, तानाजी सावंतांच्या मुलासाठी कायपण!

Last Updated:

Tanaji Sawant: संबंधित व्यक्ती घरातून निघून गेल्यानंतरच्या २४ तासांनंतर अपहरणाची तक्रार घेतली जाते. परंतु तानाजी सावंत यांचा वट पाहून पुणे पोलिसांना तक्रार घ्यायला लागली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
 चंद्रकांत फुंदे, पुणे : माजी मंत्री, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तानाजी सावंत यांचा रुसून गेलेला मुलगा अखेर पुणे विमानतळावर उतरला. एरवी थंड करून खाणाऱ्या पुणे पोलीसांनी तानाजी सावंत यांच्या तक्रारीनंतर वाऱ्याच्या वेगाने सूत्रे फिरवली. अवघ्या चार तासांत बँकॉकला जाणारे विमान आणि सावंतांचा मुलगा दोघांनाही पुण्यात लँड करण्यास पुणे पोलिसांनी भाग पडले. पुणे पोलिसांच्या कार्यतत्परतेची राज्यात जोरदार चर्चा आहे.
तानाजी सावंत
तानाजी सावंत
advertisement

संबंधित व्यक्ती घरातून निघून गेल्यानंतरच्या २४ तासांनंतर अपहरणाची तक्रार घेतली जाते. परंतु तानाजी सावंत यांचा वट पाहून पुणे पोलिसांना तक्रार घ्यायला लागली. सायंकाळी साडे चारच्या सुमारास तानाजी सावंत यांनी लेकाच्या बेपत्ता असण्याची तक्रार दिली. त्यानंतर पुणे पोलिसांनी तातडीने सूत्रे फिरवून त्यांच्या लेकाविषयी सगळी माहिती घेऊन संबंधित यंत्रणांना कामाला लावले.

पुणे पोलिसांनी वाऱ्याच्या वेगाने सूत्रे फिरवली

advertisement

सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत हा दुपारी दुपारी चार वाजताच्या सुमारास घरातून तडकाफडकी बाहेर पडला. स्पेशल चार्टर फ्लाईटने तो बँकॉकला निघाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. बजाब एव्हिएशनच्या फाल्कन 2000 एलएक्स नावाच्या खासगी विमानाने ऋषीराज सावंत तीन मित्रांसह बँकॉकला जायला निघाले. पुणे पोलिस आयुक्तांनी एअर इंडिया ऑथॉरिटीमार्फत सूत्रे हलवून हवेतूनच विमान मागे फिरवले. चेन्नईला न उतरताच विमान हवेतूनच माघारी फिरले. रात्री आठ वाजून २० मिनिटांनी सावंतांच्या मुलाचे खासगी विमान पुणे विमानतळावर लँड झाले.

advertisement

अन् हवेतूनच विमान माघारी फिरवले

कौटुंबिक वादातून घरातून बाहेर पडल्याला मुलाला थांबविण्यासाठी शिवसेना नेते, माजी मंत्री तानाजी सावंत यांनी संपूर्ण यंत्रणा वेठीस धरली. पुणे पोलिसांवर दबाव आणून तत्काळ गुन्हा दाखल करून त्यांनी खासगी विमान कंपनीला विमान चेन्नईला उतरवून घ्यायला भाग पाडले.

तानाजी सावंत हे शिवसेनेचे मोठे आणि महत्त्वाचे नेते मानले जातात. त्यांनी याआधी महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्रिपदावर काम करताना अनेक महत्त्वाची खातीही सांभाळली आहेत. पुणे आणि परिसरात त्यांचे आर्थिक साम्राजही मोठे असल्याने त्यांचा दबदबा आहे. त्याचमुळे कौटुंबिक वादातून सगळी माहिती असतानाही केवळ मुलाला जाऊ न देण्याच्या हट्टापोटी यंत्रणा वेठीस धरल्याचे पोलिसांनी खासगीत माध्यम प्रतिनिधींनी सांगितले.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
असा वट पाहिजे... बँकॉकला जाणारं विमान हवेतूनच माघारी फिरवलं, तानाजी सावंतांच्या मुलासाठी कायपण!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल