काही महिन्यांपूर्वीच प्रियकरासोबत आरतीने लग्नगाठ बांधली. लग्नाच्या काही महिन्यानंतरच आरतीचे अपघाती निधन झाल्यामुळे तिच्या घरच्यांवर मोठा आघात झाला आहे. लग्नानंतर आरती तिच्या पतीसोबत ठाणे पश्चिमेतील ओवळा परिसरामध्ये राहत होती. सोमवारी रात्री घरी जात असताना आरतीचा वाघबीळ उड्डाणपुलावर खड्ड्यांनी घात केला आणि तिच्या दुचाकीचा नियंत्रण सुटून ती खाली पडली. त्याचवेळी मागून येणाऱ्या कंटेनरने तिला धडक दिली. ही धडक एवढी जबरदस्त होती की कंटेनरखाली चिरडून तिचा मृत्यू झाला.
advertisement
रोज रात्रीपर्यंत आरती घरी पोहोचायची, पण सोमवारी बराच वेळ झाला तरीही ती घरी न पोहोचल्या मुळे तिच्या सासरकडील लोकं तिची वाट पाहत होते. फार वेळ झाला तरीही आरती घरी न आल्यामुळे सर्वच बेचैन झाले. शेवटी रात्री उशिरा आरतीच्या निधनाची बातमी तिच्या घरच्यांच्या कानावर पडली आणि सर्वांनी एकच टाहो फोडला. सुखी संसाराचे स्वप्न घेऊन जगणार्या आरतीने तिच्या पतीसोबत खूप सुखी संसाराची स्वप्न रंगवली होती. परंतू आता सर्व माती मोल ठरली आहेत.