खोलीतून दुर्गंधी येत असल्याने घटना उघडकीस
18 सप्टेंबर रोजी कोनगाव याठिकाणी गणेशनगर येथील एका खोलीतून दुर्गंधी येत असल्याने त्याची माहिती स्थानिक पोलिसांना मिळाल्यानंतर सदर ठिकाणी एका महिलेची धारदार हत्याराने हत्या झाल्याचे उघड झाले होते. महिलेच्या मैत्रिणीने दिलेल्या तक्रारीवरून हत्येचा गुन्हा नोंदवून पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे, कोनगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मयत मधू प्रजापती हिच्या मैत्रिणीकडे केलेल्या चौकशीत मधू हीचा मित्र शब्बीर दिलावर शेख यांचे नाव समोर आले. त्याच्या मोबाईलचा तांत्रिक तपास करीत अंबरनाथ येथील कंपनी मधील त्याचे सहकारी यांच्याकडे माहिती घेतली असता तो पश्चिम बंगाल राज्यात पळून गेल्याचे निष्पन्न झाले.
advertisement
वाचा - क्लिनिकमधील नर्ससोबतचे प्रेमसंबंध पडले महागात; डॉक्टरने गमावला जीव, काय घडलं?
त्यानंतर पोलीस पथक आरोपी शब्बीर याच्या शोधासाठी पश्चिम बंगाल राज्यातील त्याच्या मूळगावी दाखल झाले. स्थानिक पश्चिम बंगाल येथील पोलिसांच्या मदतीने तपास केला असता तो सासुरवाडी येथे निघून गेल्याचे समजताच सारापुला जिल्हा 24 परगणा येथे लपून बसलेल्या शब्बीर यास ताब्यात घेतले. आरोपी शब्बीर यास मयत मैत्रीण मधू हीचे दुसऱ्या व्यक्तीसोबत सुध्दा प्रेम संबंध असल्याच्या संशयावरून ही हत्या केल्याचा प्राथमिक कारण असल्याची माहिती पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी दिली आहे.