TRENDING:

‘…हे धोरण अवलंबलं म्हणूनच विजयी’, रवींद्र चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांचा विजयानंतर जल्लोष

Last Updated:

डोंबिवली पूर्व या मतदारसंघात महायुती मधील भारतीय जनता पक्षाकडून डोंबिवलीचे विद्यमान आमदार राहुन गेलेले रवींद्र चव्हाण आणि महाविकास आघाडी मधील  शिवसेना उबाठा गटाकडून दीपेश म्हात्रे हे दोघं उमेदवार होते. यामध्ये रवींद्र चव्हाण यांनी बाजी मारली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
साक्षी पाटील, प्रतिनिधी 
advertisement

डोंबवली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय झाला आहे. त्यामुळे सध्या संपूर्ण महाराष्ट्रातच जल्लोषाचे वातावरण आहे. डोंबिवलीत सुद्धा कल्याण ग्रामीण महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. डोंबिवली विधानसभा मतदारसंघ - 143 हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या 288 मतदारसंघांपैकी एक आहे. यंदा डोंबिवली पूर्व या मतदारसंघात महायुती मधील भारतीय जनता पक्षाकडून डोंबिवलीचे विद्यमान आमदार राहुन गेलेले रवींद्र चव्हाण आणि महाविकास आघाडी मधील  शिवसेना उबाठा गटाकडून दीपेश म्हात्रे हे दोघं उमेदवार होते. यामध्ये रवींद्र चव्हाण यांनी बाजी मारली आहे.

advertisement

मत मोजणीच्या सुरुवाती पासूनच आमदार रवींद्र चव्हाण, दीपेश म्हात्रे आणि इतरही उमेदवारांच्या पुढे होते. रवींद्र चव्हाण यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेतली होती ती शेवटपर्यंत सोडली नाही. 50000 मतांच्या आघाडीने रवींद्र चव्हाण जिंकून आले. त्यामुळे सध्या डोंबिवलीत उत्सवाच वातावरण आहे. ठिकठिकाणी बँजो, ढोल ताशे आणि डीजे वाजत आहेत. रवींद्र चव्हाण यांच्या विजयाचं कारण त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं रवींद्र चव्हाण यांनी सबका साथ सबका विकास हे धोरण अवलंबलं आणि म्हणूनच ते विजयी झाले.

advertisement

सोलापूर दक्षिणमध्ये सुभाष देशमुखांची हॅट्रिक, कार्यकर्त्यांनी केला जल्लोष, विजयानंतर म्हणाले...

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुरामुळे शेती झाली बाधित? ही पिकं घेतली तरी येईल हातात उत्पन्न
सर्व पहा

सुरुवातीपासूनच डोंबिवलीकरांचा कल हा रवींद्र चव्हाण यांच्या कडे होता. रस्त्यांची काम, कॉंक्रिटीकरण, पाण्याचा प्रश्न यंदाच्या प्रचारातले मुख्य मुद्दे होते. गेल्या निवडणुकीत सुद्धा या प्रश्नांच्या मुद्द्यांवरच प्रचार झाला होता. आणि त्यामुळे रवींद्र चव्हाण जिंकून आले होते. यंदाही डोंबिवली रवींद्र चव्हाण यांनी बाजी मारली, असं कार्यकर्त्यांनी सांगितलं.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
‘…हे धोरण अवलंबलं म्हणूनच विजयी’, रवींद्र चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांचा विजयानंतर जल्लोष
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल