ठाणे ते बेलापूर प्रवास सुपरफास्ट होणार! नवी मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Navi Mumbai: ठाणे ते बेलापूर महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांना आता वाहतूककोंडाचा सामना करावा लागणार नाही. नवी मुंबई महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे.
ठाणे: ठाणे-नवी मुंबई परिसरात सध्या विकासकामांचा वेग वाढलेला आहे. मेट्रो प्रकल्प, नवीन रस्ते, तसेच उड्डाणपूल यांच्या उभारणीमुळे प्रवाशांना लवकरच वाहतूककोंडीचा सामना करावा लागणार नाही. या यादीत आता ठाणे-बेलापूर मार्गावरील तीन महाकाय उड्डाणपुलांचा समावेश होणार आहे. त्यामुळे ठाणे ते बेलापूर प्रवास आता सुस्साट होणार आहे.
तीन महाकाय उड्डाणपूलांचे नियोजन
नवी मुंबई महापालिका प्रशासनाने ठाणे-बेलापूर मार्गावर तीन ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याचे नियोजन केले आहे. या प्रकल्पावर आणि संबंधित कामांवर सुमारे 900 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तुर्भे परिसरात हा मार्ग सायन-पनवेल महामार्गाला जोडत असल्याने दररोज मोठी वाहतूककोंडी निर्माण होते. त्यामुळे या ठिकाणी बीएसएफ कंपनी ते हुंदाई शोरूमदरम्यान डबलडेकर पूल उभारण्याची तयारी सुरू आहे.
advertisement
वाढत्या वाहतुकीवर नियंत्रण
रबाळे आणि ऐरोली परिसरात संध्याकाळच्या वेळी वाहनचालकांना तासनतास अडकून पडावे लागते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्यानंतर या मार्गावर वाहनांची संख्या आणखी वाढेल. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेची तयारी आत्तापासूनच सुरू करण्यात आली आहे.
advertisement
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले की, “विमानतळ सुरू झाल्यानंतर शहरात वाहनांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे ठाणे-बेलापूर मार्गाचे नूतनीकरण आणि तीन उड्डाणपूल उभारण्याचा अहवाल तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.”
किती खर्च, कुठे पूल?
या तिन्ही उड्डाणपुलांवर होणारा खर्च पुढीलप्रमाणे —
क्रिस्टल हाऊस ते पावणे गाव: ₹110 कोटी
रबाळे जंक्शन: ₹171 कोटी
advertisement
बीएसएफ कंपनी ते हुंदाई शोरूम: ₹338 कोटी
एकूण सुमारे ₹600 कोटींच्या खर्चाचे हे प्रकल्प HAM (Hybrid Annuity Model) अंतर्गत राबवले जाणार आहेत.
डबलडेकर पूल होणार आकर्षण
view commentsतुर्भे स्टोअर्स येथील उड्डाणपुलाचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे या भागातील वाहतूक मोकळी होत असली तरी पुढे तुर्भे नाका येथे वाढणाऱ्या वाहतुकीचा ताण लक्षात घेऊन डबलडेकर पूल उभारण्याची हालचाल महापालिकेने सुरू केली आहे. हा पूल वाहतूक कोंडी फोडण्यासाठी निर्णायक ठरणार आहे. नवी मुंबई महापालिकेचे शहर अभियंता शिरीष आरदवाड यांनी सांगितले की, “ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूक मोकळी करण्यासाठी हे तीन उड्डाणपूल निर्णायक ठरतील. लवकरच कामाचे इस्टिमेट तयार करून पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येईल
Location :
Navi Mumbai,Thane,Maharashtra
First Published :
November 04, 2025 8:27 AM IST


