Mumbai Airport Closed : मोठी अपडेट! मुंबई विमानतळ तब्बल 6 तास बंद राहणार; जाणून घ्या कारण काय?
Last Updated:
Mumbai International Airport Closed : मुंबई विमानतळ 20 नोव्हेंबर रोजी सहा तास बंद राहणार आहे. बंद राहण्यामागचे नेमके कारण काय आणि पुन्हा कधी सुरु होणार ते सविस्तर जाणून घेऊयात.
मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी मुंबई विमानतळ तब्बल सहा तास बंद राहणार आहे. मान्सून संपल्याने धावपट्ट्यांची देखभाल तसेच दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने हे वेळापत्रक ठरवण्यात आले आहे.
किती वेळ राहणार बंद?
विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत दोन्ही धावपट्ट्या बंद राहतील. या काळात कोणतेही विमान उड्डाण घेणार नाही किंवा उतरणारही नाही. देखभाल पूर्ण झाल्यानंतर संध्याकाळपासून नियमित उड्डाणे पुन्हा सुरू होतील.
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा देशातील सर्वाधिक वर्दळीचा विमानतळ असून दररोज शेकडो विमानांची ये-जा येथे होते. त्यामुळे अशा देखभाल कामासाठी वेळोवेळी ठराविक दिवशी विमान वाहतूक थांबवली जाते. या बंद कालावधीत प्रवाशांच्या सोयीसाठी आणि उड्डाण वेळापत्रकात गोंधळ होऊ नये म्हणून विमान कंपन्यांना सहा महिने आधीच सूचना देण्यात आल्या आहेत. प्रवाशांनी 20 नोव्हेंबर रोजीच्या प्रवासाचे नियोजन करताना या वेळेची नोंद घ्यावी आणि आवश्यक बदल करावेत, असे आवाहन विमानतळ प्रशासनाने केले आहे.
advertisement
एकूणच पाहता 20 नोव्हेंबर रोजी सहा तास मुंबई विमानतळावर उड्डाणे बंद राहणार असली तरी हे नियमित देखभाल काम प्रवासी सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 04, 2025 7:45 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Airport Closed : मोठी अपडेट! मुंबई विमानतळ तब्बल 6 तास बंद राहणार; जाणून घ्या कारण काय?


