Mangal Gochar: करिअर संकटात, 1 चूक महागात पडेल! अशुभ अंगारक योग या 3 राशींसाठी काळ
- Published by:Ramesh Patil
 
Last Updated:
Mangal Gochar Astrology : ज्योतिषशास्त्रात मंगळाला ग्रहांचा सेनापती मानलं जातं. त्यामुळे त्याच्या स्थितीत होणाऱ्या बदलांचा परिणाम 12 राशींसह देश-दुनियेवरही मोठ्या प्रमाणात दिसून येतो. मंगळ साधारणपणे 45 दिवसांत राशी बदलतो. सध्या मंगळ वृश्चिक राशीत आहे आणि 7 डिसेंबरपर्यंत तो याच राशीत राहील. त्यामुळे त्याची युती किंवा दृष्टी कोणत्या ना कोणत्या ग्रहावर पडतच राहील.
advertisement
 वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, भूमीपुत्र मंगळानं 27 ऑक्टोबर रोजी वृश्चिक राशीत प्रवेश केलाय. तो मकर राशीत अकराव्या भावात राहून कुंभ राशीत दृष्टी टाकत आहे, ज्यामुळे त्या राशीत उपस्थित असलेल्या राहूसोबत अंगारक योगाची निर्मिती होत आहे. या धोकादायक योगामुळे काही राशीच्या लोकांना रागाच्या भरात स्वत:वरील ताबा सुटणे ते निर्णय क्षमतेवर वाईट परिणाम झाल्याचं दिसून येऊ शकतं. याव्यतिरिक्त, आक्रमकता, उत्साह, ऊर्जा आणि गतीमध्ये वाढ होते. पण, जर इतर शुभ ग्रहांसोबत संयोग होत असेल, तर याचा प्रभाव बऱ्याच अंशी कमी होतो.
advertisement
 मकर रास - मंगळ वृश्चिक राशीत प्रवेश करून या राशीच्या अकराव्या भावात विराजमान झाला आहे आणि त्याची चौथी दृष्टी दुसऱ्या भावावर पडत आहे. अशात तयार झालेला अंगारक योग या राशीच्या लोकांची चिंता थोडी वाढवू शकतो. तुमच्या विचारसरणीवर याचा जास्त प्रभाव दिसून येईल. तुमच्या बोलण्यात रागाचं प्रमाण वाढू शकतं. अशा वेळी, झालेली कामंही बिघडू शकतात. याशिवाय, घाईगडबडीत तुम्ही कोणताही चुकीचा निर्णय घेऊ शकता, जो भविष्यात तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतो. अशा वेळी तुम्ही तुमच्या बोलण्यावर थोडा संयम ठेवा.
advertisement
advertisement
 कर्क रास - या राशीच्या पाचव्या भावात मंगळ विराजमान असेल. यासोबतच, मंगळाची दृष्टी आठव्या भावावर पडत आहे, जिथे राहू आधीच उपस्थित आहे. अशा स्थितीत या राशीच्या लोकांनी काही गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे. आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा, कारण यामुळे झालेली कामं बिघडू शकतात. गर्भवती महिलांनी अधिक काळजी घ्यावी. यासोबतच, आई-वडिलांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. आत्मविश्वासामध्येही काही प्रमाणात कमतरता दिसून येऊ शकते.
advertisement
 कुंभ रास - कुंभ राशीच्या लोकांसाठी अंगारक योग अनेक क्षेत्रांमध्ये समस्या वाढवू शकतो. या राशीच्या लोकांनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. भावंडांसोबत एखाद्या गोष्टीवरून वाद-विवाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्या बोलण्यावर थोडा लगाम ठेवा. सूर्य या राशीच्या दहाव्या भावात येईल. अशा वेळी तुमच्या जीवनसाथीसोबतचे तुमचे संबंध बिघडू शकतात. कार्यक्षेत्रातही थोडे जागरूक राहण्याची गरज आहे. याचा तुमच्या करिअरवर वाईट परिणाम होऊ शकतो. प्रत्येक काम विचारपूर्वक केल्यास ते तुमच्यासाठी चांगले राहील.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)


