आधी कानाखाली, मग त्याच्याशीच दोनदा लग्न; 14 वर्षांनी मोडला धर्मेद्रच्या लाडक्या लेकीचा संसार

Last Updated:

Bollywood Actress : अभिनेत्री ईशा देओल कायम आपल्या जीवनातील काही न काही वादविवादांवर चर्चेत असते.तिने खूप प्रयत्न करुनही तिचे नाते टिकू शकले नाही.

News18
News18
अभिनेते धर्मेंद्र आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओलने बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केले आहे. तिचे पर्सनल असो की प्रोफेशनल लाइफ कायमच चर्चेत असते. 2012 मध्ये तिने तिचा बॉयफ्रेंड भरतसोबत लग्न केले. पण त्यांचे हे नाते जास्त काळ टिकले नाही. त्यांच्या नात्यात 2024 मध्ये त्यांचा डिवोर्स झाला. या डिवोर्स मागचं कारण काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे.  ईशा आणि भरत हे दोघेही अगदी शाळेत असल्यापासून एकमेकांना ओळखतात. पण या दोघांच्या शाळा या वेगवेगळ्या होत्या. हे दोघं शाळेतील स्पर्धेच्या वेळी एकत्र यायचे. एका मुलाखतीमध्ये भरतने त्यांची लव्ह स्टोरी सांगितली होती.
काय म्हणाला भरत ?
भरत एका मुलाखतीमध्ये बोलताना म्हणाला, "आमच्यात शाळेत असल्यापासून मैत्री आहे. शाळेत आमची वेगवेगळ्या स्पर्धेदरम्यान भेट व्हायची. एकदा शाळेत मी ईशाला प्रपोज करणार होतो पण तिचा हात धरला. हे तिला आवडले नाही आणि तिने माझ्या जोरदार कानाखाली मारली. ईशा माझी पहिली क्रश आणि प्रेम आहे. त्यानंतर मी ईशाने एका टिशू पेपरवर आपला नंबर लिहून दिला होता. मग पूढे आमचे बोलणे वाढत गेले."
advertisement
"शाळेच्या काही काळानंतर आमच्यात दुरावा आला. त्यामुळे आमच्यात नंतर कधीच भेट झाली नाही. पुढे 10 वर्षांनंतर एकदा आमची कॅनडाच्या नायगरा फॉल्सला भेट झाली. त्यावेळी पुन्हा आमचे नाते सुरु झाले. मी तिची परवानगी घेऊन पुन्हा एकदा तिचा हात पकडला. त्यावेळी तिला काहीही प्रॉब्लेम आला नाही."
12 वर्षांनंतर नाते तुटले
असे म्हटले जात आहे की, ईशा आणि भरत यांचे एकमेकांशी पटत नव्हते, त्यामुळे त्यांनी वेगळे व्हायचा निर्णय घेतला. नाते नीट टिकून राहावं म्हणून तिने सिनेमात काम करणे सोडून दिले. तरीही नाते तुटले. तिचे लग्नाचे सुरुवातीचे दिवस चांगले गेले होते. त्यांनी 2012 मध्ये लग्न केलं. लग्नाला पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर पुन्हा लग्न केले होते.  तेव्हा ईशा म्हणाली, "ही एक आमच्या सिंधी कुटूंबाची परंपरा आहे. मी माझ्या नवऱ्यासोबत पुन्हा लग्न केले. ज्यामुळे आमचे नाते अजून घट्ट होईल. पण आमच्या नशीबाला काहीतरी वेगळेच हवे होते ."
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
आधी कानाखाली, मग त्याच्याशीच दोनदा लग्न; 14 वर्षांनी मोडला धर्मेद्रच्या लाडक्या लेकीचा संसार
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement