Ulhasnagar News : आठ महिन्यांचा संघर्ष संपला! उल्हासनगरातील महिलांना मिळाला मोठा दिलासा; कारण काय?

Last Updated:

Women Empowerment : उल्हासनगरमध्ये रखडलेली लोखंडी स्टॉल वाटप योजना अखेर सुरु झाली आहे. या योजनेतून पात्र महिलांना रोजगाराची नवी संधी मिळणार असून स्वावलंबनाच्या दिशेने त्यांचा प्रवास अधिक मजबूत होईल.

News18
News18
उल्हासनगर : महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. तब्बल आठ महिन्यांपासून रखडलेली महिला आणि बालकल्याण विभागाची लोखंडी स्टॉल वाटप योजना अखेर मार्गी लागली आहे. त्यामुळे रोजगाराच्या नव्या संधी खुल्या झाल्या असून महिलांच्या स्वावलंबनाच्या दिशेने मोठं पाऊल पडले आहे
नेमकी ही योजना आहे तरी काय?
शासनाच्या सक्षमीकरण योजनेअंतर्गत महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी लोखंडी स्टॉल वाटप करण्याची योजना सुरू करण्यात आली होती. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून ही प्रक्रिया ठप्प पडली होती. त्यामुळे लाभार्थी महिला नाराज होत्या. अखेर महिलांनी आपला संताप व्यक्त करत आंदोलन केले.
या आंदोलनानंतर आमदार कुमार आयलानी आणि समाजसेवक शिवाजी रगडे यांनी प्रशासनाशी चर्चा केली. त्यांच्या हस्तक्षेपानंतर महापालिकेने पुढील आठवड्यात स्टॉल वाटप प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे महिलांमध्ये पुन्हा एकदा आशेचा किरण दिसू लागला आहे.
advertisement
फेब्रुवारी-मार्च 2025 दरम्यान शासनाच्या योजनेअंतर्गत महिलांकडून लोखंडी स्टॉलसाठी अर्ज मागवण्यात आले होते. प्रत्येकी 8 फूट लांबी आणि 8 फूट रुंदीच्या आकाराचे स्टॉल देण्याचे ठरले होते. एकूण 50 महिला लाभार्थींची निवड करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले आणि प्रमाणपत्रही वाटप झाले. मात्र, प्रत्यक्ष पाहता स्टॉल वाटप न झाल्याने महिला निराश झाल्या होत्या.
advertisement
दरम्यान काही दिवसांपूर्वी प्रशासनाने संपूर्ण प्रक्रिया रद्द करून नव्या अर्जांची घोषणा केली होती. या निर्णयामुळे महिलांमध्ये असंतोष निर्माण झाला. त्यानंतर आमदार आणि समाजसेवकांच्या हस्तक्षेपामुळे प्रशासनाने महिलांच्या मागण्यांचा विचार करून प्रक्रिया पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे.
आता या आठवड्यातच स्टॉल वाटपाची प्रक्रिया सुरू होणार असल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या उपक्रमामुळे उल्हासनगरमधील अनेक महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची आणि आर्थिक स्वावलंबन मिळवण्याची संधी मिळणार आहे.
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
Ulhasnagar News : आठ महिन्यांचा संघर्ष संपला! उल्हासनगरातील महिलांना मिळाला मोठा दिलासा; कारण काय?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement