चंद्रमोहन (वय ५३) असे मृत कामगाराचे नाव आहे, तर राज मल्होत्रा (वय २७) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. हे दोघेही गायमुख घाट परिसरातील कामगार वसाहतीमध्ये राहणारे असून, एकमेकांच्या ओळखीचे आहेत. बुधवारी रात्री ते दोघांमध्ये वाद झाला, यानंतर ही हत्येची घटना घडली. आरोपीनं चंद्रमोहनची जमीनीवर डोकं आदळून हत्या केली.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, ५३ वर्षीय चंद्रमोहन आणि २७ वर्षीय आरोपी राज मल्होत्रा दोघंही घोडबंदरच्या गायमुख घाट परिसरात कामगार वसाहतीमध्ये राहतात. बुधवारी रात्री राज मल्होत्रा आणि चंद्रमोहन यांच्यात दारुच्या नशेत क्षुल्लक कारणावरून वाद झाले. हा वाद विकोपाला गेल्यानंतर मल्होत्रा याने चंद्रमोहनचे डोके अनेकदा जमीनीवर आपटले.
ही घटना घडताच परिसरातील इतर कामगारांनी चंद्रमोहनला तत्काळ रुग्णालयात नेले. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता, उपचार करण्यापूर्वीच डॉक्टरांनी चंद्रमोहनला मृत घोषित केले. या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी राजला बेड्या ठोकल्या आहेत. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.