डोंबिवली : जून महिन्याचा पहिला आठवडा संपत आला तरी अजूनही ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना पाणी कपातीच्या समस्येला सामोर जावं लागत आहे. ठाणेकरांना सुरुवातीला 7 जून पर्यंत पाणी कपात असेल, असं सांगण्यात आलं होतं. मात्र, आता जून महिन्याचा दुसरा आठवडा सुरू झाला तरी अद्याप ठाणे जिल्ह्यावर पाणी कपातीची टांगती तलवार कायम आहे.
advertisement
काय आहे यामागचं कारण?
ठाणे जिल्ह्यातील धरणातील पाणी पातळीत घट होत आहे. त्यात अजूनही या धरण क्षेत्रात पावसाने मात्र हजेरी लावलेली नाही. गेल्या दहा दिवसांत धरणक्षेत्र वगळून ठाण्यात केवळ 114 मिमी पाऊस झाला. जून महिन्याचा पंधरवडा संपत आला तरी अद्याप पावसाने दमदार हजेरी न लावल्यामुळे ठाणेकरांवर ही पाणी कपातीची वेळ आलेली आहे.
100 वर्षांनी अद्भूत योग, आयुष्यात येणार आनंद, करिअरमध्येही मिळणार यश, 3 राशीच्या लोकांची चांदी
कमी पावसामुळे शेतकऱ्यांवर ही संकट -
ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही पावसाने अद्याप हजेरी लावली नसल्याने शेतकऱ्यांना पेरणी कधी करावी? असा प्रश्न पडला आहे. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात पेरणी शक्यतो जूनच्या पहिल्या आठवड्यातच केली जाते. मात्र, यंदा जिल्ह्यात मुबलक पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नका, असे आवाहन कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना करण्यात आले आहे. त्यामुळे ठाण्यातील शेतकरीही पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
ठाणे जिल्ह्यातील गृहिणींवर पाणी कपातीमुळे संकट -
सात दिवस सांगितलेला पाणी कपातीचा प्रश्न आता पंधरवडा आला तरी सुटलेला नसल्यामुळे गृहिणींवर नेहमीची घरगुती कामे पाणी नसताना कशी करावी, असा यक्ष प्रश्न उभा राहिला आहे. तर सध्या सर्वच ठाणेकर कधी दमदार पाऊस पडतोय आणि पाणी कपात कधी संपेल, याची आतुरतेने वाट पाहत आहेत.