नवीन व्यवस्थेनुसार मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरून गार्डन रेस्टॉरंट आणि मंगल कार्यालय मार्गे मिनार बंगला परिसरात जाणाऱ्या वाहनांना श्रीनगर चौकावर थांबवले जाईल. या ठिकाणी वाहतूक पोलिस वाहनांचा मार्गदर्शन करतील आणि त्यांना पर्यायी मार्गावरुन पुढे जाण्यास सांगितले जाईल. आता या वाहनांना थेट मिनार बंगला किंवा श्रीनगर चौकच्या मुख्य मार्गावरून जाण्याची परवानगी नसेल.
या बदलानुसार वाहनधारकांना थोडा वेगळा मार्ग स्वीकारावा लागेल. मुंबईकडे जाणारे सर्व वाहन अबैंक ऑफ महाराष्ट्र आणि रूपल लक्ष्मी इमारतीच्या परिसरातून होऊन शारदा लाँड्री आणि मिनार बंगला मार्गे डाव्या वळणाने पुढे जावे लागेल. अशा प्रकारे श्रीनगर पोलीस ठाण्याच्या परिसरातील आणि परमार्थ निकेतन रुग्णालयाजवळील वाहतुकीची गर्दी कमी होण्यास मदत होईल.
advertisement
ठाणे ट्रॅफिक पोलिसांनी नागरिकांना विनंती केली आहे की ते नवीन मार्गदर्शक सूचना काळजीपूर्वक पाळाव्यात आणि मार्गात येणाऱ्या कोणत्याही अडचणीविषयी पोलिसांना तत्काळ माहिती द्यावी. ट्रॅफिक पोलिसांनी हेही स्पष्ट केले आहे की हा बदल प्रायोगिक आहे आणि 30 दिवसांनंतर त्याचा परिणाम पाहून अंतिम निर्णय घेण्यात येईल.
वागले एस्टेट परिसरातील रहिवासी आणि वाहनचालकांनी सुरुवातीला या बदलामुळे काहीसा त्रास होऊ शकतो.मात्र,वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने हा उपाय अत्यंत आवश्यक आहे. पोलिसांनी मार्गदर्शनाच्या ठिकाणी चिन्हे लावली आहेत आणि आवश्यक त्या ठिकाणी पोलिस देखरेख ठेवणार आहेत. जेणेकरून वाहतूक सुरळीत चालू राहील.
विशेष म्हणजे या नवीन वाहतूक व्यवस्थेमुळे केवळ श्रीनगर पोलीस ठाण्याच्या परिसरातीलच नाही, तर संपूर्ण वागले एस्टेट परिसरातील मुख्य मार्गांची वाहतूकही सुलभ होईल. वाहनधारकांनी पूर्वतयारी करून नवीन मार्गाचा अवलंब केला तर वाहनांचा प्रवास सुरक्षित आणि जलद होईल.