TRENDING:

Water Rates: डोंबिवलीत पाणी महागलं, एमआयडीसीत मोजावे लागणार आता एवढे पैसे

Last Updated:

डोंबिवलीकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. औद्योगिक क्षेत्रातील पाणी वापरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
डोंबिवली : डोंबिवलीकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने इतर एमआयडीसी क्षेत्रांबरोबर डोंबिवली एमआयडीसीतील निवासी, व्यापारी आणि औद्योगिक क्षेत्रातील पाणी वापरात 1 सप्टेंबर 2025 पासून वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा योजनांवर होणारा खर्च आणि या खर्चाच्या प्रमाणात महसुली जमा कमी वसूल होत आहे. त्यामुळे दरवर्षीच्या पाणी पुरवठा योजनांवरील महसुली खर्चात वाढ होत असल्याने या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी निर्णय घेतला आहे.
News18
News18
advertisement

एमआयडीसीचे मुख्य अभियंता पी. बी. चव्हाण यांनी यासंदर्भातचे पत्र डोंबिवली एमआयडीसीसह राज्यातील इतर एमआयडीसीच्या कार्यकारी अभियंतांना पाठविले आहे. तसेच या दरवाढीची माहिती एमआयडीसी क्षेत्रातील कंपनी चालक, व्यापारी संकुल, शाळा, खासगी आस्थापना, सभागृह, महाविद्यालय, तसेच निवासी विभागातील रहिवाशांना देण्याचे सूचित केले आहे.

Pimpri News : रॅम्पचं उद्घाटन झालं, पण रस्ता अद्याप अधांतरी; चिंचवडकर त्रस्त

advertisement

एक रूपयांची पाणी दरवाढ 

औद्योगिक क्षेत्राबाहेरील घरगुती ग्राहकांच्या पाणी दरात एक रूपयांची पाणी दरवाढ करण्यात आली आहे. हा दर यापूर्वी 8 रपये 25 पैसे प्रति युनिट होता. तो आता नवीन आदेशाप्रमाणे 9 रूपये 25 पैसे प्रति युनिट करण्यात आला आहे. शाळा, महाविद्यालये, व्यापारी संकुल, खासगी व्यापारी आस्थापना, सभागृह यांच्या पाणी दरात दोन रूपये 75 पैशांची वाढ करण्यात आली आहे. हा दर यापूर्वी 22 रूपये 50 पैसे होता. तो आता 25 रूपये 25 पैसे करण्यात आला आहे. औद्योगिक क्षेत्रातील विविध प्रकारच्या कंपन्या, पाणी कच्चा माल म्हणून वापरणाऱ्या व्यावसायिकांसाठी 28 रूपये 25 रूपये प्रति युनिट दरवाढ करण्यात आली आहे. त्यांचा पाण्याचा दर प्रति युनिट 85 ते 88 रूपये होईल, असे मुख्य अभियंता चव्हाण यांनी आदेशात म्हटले आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
Water Rates: डोंबिवलीत पाणी महागलं, एमआयडीसीत मोजावे लागणार आता एवढे पैसे
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल