याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, 25 सप्टेंबर (गुरुवारी) रोजी हा निधी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात आला. मुंबई महानगर प्रदेशातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक चांगली करण्यासाठी आणि नागरिकांना आरामदायी प्रवासाची सुविधा देण्यासाठी राज्य सरकारने मुंबई आणि ठाणे परिसरात मेट्रोचे जाळं विकसित करण्यावर भर दिला आहे. त्यानुसार एमएमआरडीएच्या माध्यमातून सुमारे 350 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गांची निर्मिती केली जात आहे.
advertisement
Weather Alert: महाराष्ट्रात वारं फिरलं, मुंबई-ठाण्यात धो धो कोसळणार, कोकणातील 6 जिल्ह्यांना अलर्ट
केंद्र आणि राज्य सरकारच्या निधीतून हे हजारो कोटी रुपयांचे प्रकल्प बांधले जात आहेत. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यातील काही प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी तर काही मेट्रो मार्गांच्या कामांना गती देण्यासाठी राज्य सरकारने पुन्हा कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
कोणत्या प्रकल्पांसाठी किती निधी
कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो मार्गासाठी मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशन सुमारे 37 हजार 275 कोटी रुपये खर्च करत आहे. लवकरच हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होणार आहे. शिल्लक राहिलेली कामं पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने 80 कोटी रुपये दिले आहेत.
ठाणे-कल्याण-भिवंडी मेट्रोसाठी - 32 कोटी 50 लाख रुपये
स्वामी समर्थ नगर-जोगेश्वरी-विक्रोळी मेट्रो-6साठी - 50 कोटी रुपये
दहिसर पूर्व ते डीएननगर मेट्रोसाठी - 37 कोटी 50 लाख रुपये
कल्याण-तळोजा मेट्रोसाठी - 10 कोटी रुपये
डीएन नगर ते मंडाले मेट्रोसाठी - 73 कोटी 50 लाख रुपये
ठाण्यातील गायमुख ते मिरा रोडमधील शिवाजी चौका दरम्याना 9 किलोमीटर लांबीच्या मेट्रो
मार्गासाठी - 10 कोटी रुपये
कासारवडवली-गायमुख मार्गासाठी - 100 कोटी रुपये
अंधेरी-दहिसर पूर्व मार्गासाठी - 37 कोटी 50 लाख रुपये
अंधेरी ते विमानतळ मेट्रोसाठी - 30 कोटी रुपये