नांदेड : नांदेड शहरात आज सायंकाळी गोळीबाराचा थरार घडला. दोन कुख्यात गुन्हेगारामध्ये वाद होऊन एकाची गोळी झाडून हत्या करण्यात आली, नांदेड शहरातील इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुना गंज भागातील पहेलवान टी हाऊसच्या माघे ही घटना घडली आहे. सायंकाळी झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, गोळीबारात 25 वर्षीय सक्षम ताटे याचा खून करण्यात आला आहे. आरोपी हिमेश मामीडवार आणि अन्य एकाने त्याला गोळी झाडली, नंतर दगडाने ठेचून त्याचा खून केला अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. सक्षम ताटे आणि हिमेश मामीडवार हे दोघेही मित्र असून दोघेही गुन्हेगार आहेत दोघांवर अनेक गुन्हे दाखल आहेत. दीड महिन्यापूर्वीच सक्षम ताटे जामिनावर सुटला होता. दोघांवर देखील एमपीडीए अंतर्गत कारवाई झाली होती.
advertisement
नेमकं काय घडलं?
आज सायंकाळी सक्षम ताटे पहेलवान टी हाऊसच्या पाठीमागे गल्लीत बसला होता. तिथे हिमेश मामीडवार आपल्या सहकाऱ्यासोंबरत आला. बेसावध असलेल्या सक्षमच्या छातीवर त्याने गोळी झाडली, नंतर दगडाने ठेचून त्याचा खून करण्यात आला.
बहिणीशी प्रेम संबंध
दरम्यान सक्षम ताटे हा हिमेश मामीडवार याच्या बहिणीशी बोलत होत. माझ्या बहिणीशी का बोलतो? यावरून वाद विकोपाला गेला अन् त्यातून हिमेश याने सक्षम याची हत्या केली, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. दोन आरोपींना इतर पोलिसांनी ताब्यात घेतले . हत्येचे नेमके कारण काय, आणि या घटनेत एकूण किती आरोपी होते. त्याचा तपास कितवारा पोलीस करत आहेत .
नांदेड शहरात खंडणी, टोळी युद्धातून जीवघेणे हल्ले
शहरात दिवसेंदिवस खंडणी, टोळी युद्धातून जीवघेणे हल्ले व जिवे मारण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल गेली आहे. गुन्हेगारीने डोके वर काढले असल्याने गेल्या काही महिन्यात गुन्हेगारीच्या घटाना समोर येत आहे, यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. हाणामारी तसेच शस्त्रांचा आणि गावठी पिस्तुलचा वापर केला जात असल्याचे अलिकडच्या घटनांवरून समोर आले आहे.
त्यामुळे शहरामध्ये सर्रास रिव्हॉल्व्हर व गावठी कट्यांचा उपयोग गुन्हेकारांकडून केला जात असून या शस्त्रांची खरेदी-विक्री कुठे होत आहे, त्याचा पोलिसांनी शोध घेणे भाईगिरी संपुष्टात आणावी अशी मागणी होत आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.
हे ही वाचा :
