विमानतळावर पोहोचण्यासाठी जे रस्ते आहेत, ते पाहता प्रवाशांना कदाचित जास्त वेळ लागू शकतो. अनेक ठिकाणी वाहनांमुळे होणाऱ्या ट्रॅफिकमुळे आणि रस्त्यांची दुरावस्था पाहता प्रवासाला अंदाजे वेळेपेक्षा जास्त वेळ लागण्याची शक्यता आहे. पहिला मार्ग आहे, ठाणेकरांसाठी ठाण्यामार्गे येणार्या प्रवाशांना पूर्व द्रुत गती महामार्गाचा वापर करून पुढे मुलुंड- ऐरोली मार्ग किंवा कळवा-दिघा मार्ग वाहनचालक निवडू शकतात. मग तिथून पुढे ठाणे- बेलापूर रोड मार्गे बेलापूर- उलवे रस्त्यावरून विमानतळ गाठता येईल. ठाण्यापासून विमानतळावर पोहोचण्यासाठी अंदाजे 35 ते 40 किमीसाठी प्रवाशांना तब्बल एक ते सव्वा तासांचा अवधी लागू शकतो.
advertisement
दक्षिण मुंबईतील वरळी किंवा त्या भागातून अटल सेतू (मुंबई ट्रान्स हार्बर लिंक - MTHL) मार्गे उलवे- बेलापूर रस्त्यावरून विमानतळावर पोहोचणे सर्वात सोपे आणि जलद असू शकते. हे अंतर आणि वेळ फक्त 34 ते 35 किलोमीटर असून प्रवासासाठी केवळ एक तास लागू शकतो. वाहनचालकांना पश्चिम द्रुतगती महामार्ग वापरून जेव्हीएलआर मार्गे पूर्व द्रुतगती महामार्गावर यावे लागेल. तसेच पुढे वाशी खाडी पूल ओलांडून उलवेमार्गे विमानतळ गाठावे लागेल. ह्या मार्गावरील अंदाजे 40 ते 45 किलोमीटरचे अंतर वाहतूक कोंडीमुळे पूर्ण करण्यासाठी दीड तासाहून अधिक वेळ लागू शकतो. तर नवी मुंबईकरही ठाणेकरांप्रमाणेच रस्त्याचा वापर करू शकतात.
नवी मुंबईतील रहिवाशांसाठी ऐरोली, दिघा किंवा नेरूळ- बेलापूर भागातून पाम बीच रोड वापरून थेट बेलापूर- उलवे मार्गावर जाता येणार आहे. सर्वात कमी म्हणजे 20 ते 25 किलोमीटरचं अंतर असणार आहे, त्यामुळे विमानतळावर पोहोचण्यासाठी साधारणपणे पाऊण तासांचा वेळ लागू शकतो. वसई, पालघर, मिरा रोड या भागातून वाहनचालकांना फाऊंटन, गायमुख, घोडबंदर-ठाणे मार्गे येऊन पूर्व द्रुतगती महामार्ग आणि ठाणे-बेलापूर रोडने विमानतळ गाठावे लागेल. हा प्रवास 50 ते 60 किलोमीटरचा असून सुमारे दोन ते अडीच तास लागू शकतात. कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर या भागातून शिळफाटा किंवा महापे रोड मार्गे विमानतळावर जाता येते. हा प्रवास सुमारे 60 ते 70 किलोमीटरचा असल्याने अडीच तास किंवा त्याहून जास्त वेळ लागू शकतो.