तक्रारदार धीरज रेहपाडे हे वडधामना येथील कार्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनीत सुपरवायजर म्हणून कार्यरत आहेत. या कंपनीचा ट्रकचालक जितू वर्मा याने कंपनीच्या आदेशानुसार 15 लाख रुपयांचा साखरेचा माल ट्रकमध्ये भरला होता. रात्री सुमारास 10 वाजता वर्माने ट्रक काटोल नाका चौकात उभा करून तो घरी गेला. मात्र याच दरम्यान आरोपी ऋषभने संधी साधत साखरेने भरलेला ट्रक पळवून नेला.
advertisement
तपासाची चक्रे फिरवली
दुसऱ्या दिवशी सकाळी सुमारे 10 वाजता जेव्हा ट्रकचालक जितू वर्मा घटनास्थळी आला, तेव्हा त्याला ट्रक दिसून आला नाही. त्याने तातडीने ही माहिती सुपरवायजर रेहपाडे यांना दिली. रेहपाडे यांनी गिट्टीखदान पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून तपासाची चक्रे फिरवली.
50 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तांत्रिक तपासाला सुरुवात केली. सीसीटीव्ही फुटेज, लोकेशन ट्रॅकिंग आणि गुप्त माहितीच्या आधारे संशयित ऋषभ इवनाते याला ताब्यात घेण्यात आले. पोलिस चौकशीत त्याने ट्रक चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून सखोल तपास करत पोलिसांनी चोरीला गेलेला ट्रक, 135 पोते साखर यासह एकूण 50 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
कारवाईमुळे कंपनीला मोठा दिलासा
या कारवाईमुळे कंपनीला मोठा दिलासा मिळाला असून पोलिसांच्या तातडीच्या तपासामुळे चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. आरोपी ऋषभने स्वतःची दिवाळी धुमधडाक्यात साजरी करण्यासाठी ही चोरी केल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. मात्र पोलिसांनी गुन्हा आता त्याची दिवाळी तुरुंगाच्या चार भिंतीतच साजरी होणार आहे.पोलिसांच्या कारवाईमुळे गुंतागुंतीचा गुन्हे उघड झाला आहे. गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या या कामगिरीचे शहरभर कौतुक होत आहे.