"दसऱ्याच्या सगळ्यांना शुभेच्छा, किती वेळा मी बोलायचं ही अशी जीवाला जीव देणारी माणसं हेच खरं सोन आयुष्य आहे. अनेक जणांचे आपल्या शिवसेना फोडण्याचे लक्ष आहे, त्यांनी काही जणांना पळवलं ते पितळं होतं, पण सोनं माझ्याकडे आहे. वाघाचं कातडं पांघरलेले कोल्हाची गोष्ट आपण ऐकली असेल, पण गाढवाने वाघाची चादर ओढलेलं मी पहिल्यांदा पाहिला. ते अमित शाह यांचे जोडे उचालणारे आहे, त्यांच्यावर किती आणि काय बोलायचं. हा मेळावा तसाचा घेतला जसा आजपर्यंत होत आहे. हा मेळावा चिखलात घ्यावा लागला. पण कमळाबाईच्या कारभारामुळे झाला आहे. कमळाबाईने जनतेच्या आयुष्याचं वाटोळं केलं आहे.
advertisement
शेतकऱ्यांची जमीन वाहून गेली, घरं दारं वाहून गेली. शेतकरी आज विचारतोय काय खायाचं, अशी परिस्थिती आज आली नाही. मराठवाड्यात आपत्तीग्रस्त आहे. संकट खूप मोठं आहे, लातूरला भूकंप झाला होता, तेव्हा आपण गावं दत्तक घेतली होती. आता आपल्याकडे सरकार नाही. पण मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी आपल्याला फुल नाही फुलाची पाकळी तरी द्यावी लागणार आहे. आजचे मुख्यमंत्री आहे ते मुद्दाम पत्रकार परिषद घेतली
आपलं सरकार होतं तेव्हा हे बोंबलत फिरत होते ओला दुष्काळ जाहीर करा, पण आता तेच ओला दुष्काळ नाही म्हणत आहे. मी आजही तेच म्हणत आहे, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत करा. कोणतेही निकष ठेवू नका.
आमचं सरकार होतं तेव्हा आम्ही काहीही न पाहता कर्जमाफी केली होती. आपण शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं होतं, कोरोना काळ होता, नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये देत होतो, पण तेही गद्दार घेऊन पळून गेले.
मोदी गुपचूप नवाज शरीफ यांच्या वाढदिवसाला पाकिस्तानात जाऊन केक खाला, त्याला काय म्हणायचं?
हा दसरा मेळावा होत आहे, आणखी दसरा मेळावे होत आहे. संघाच्या दसरा मेळावा झाला. त्यांना १०० वर्ष झाली आहे. नेमकी गांधी जयंती आली आहे. हा योगायोग म्हणावा का, जशी संघााला १०० वर्ष झाली आहे, स्वातंत्र्य सेनानी जीजी पारीक यांचं निधन झालं आहे,. त्यांना श्रद्धांजली वाहतो. जो लढेल त्यांना हे सरकार दाबत आहे.
या सरकारने जन सुरक्षा कायदा आणला, आपण त्याला विरोध केला. सगळ्या संघटना जर कडवे डावे, तुम्ही फक्त तोंड देखत नाव सांगत आहे. सोनम वांगचूक या माणसाने अत्यंत लेह लडाखमध्ये हाड मोडणाऱ्या थंडीत जवानांसाठी सोलार टेक्लानॉजीवर छावणी बांधून दिली, पाणी मिळावी यासाठी आईस क्यूब आणले, पण न्याय हक्कासाठी त्यांनी लढाई सुरू केली करत आहे, उपोषण सुरू केलं, पण सरकार पाहायला तयार नाही.
नेपाळमध्ये जे झालं तसं मोदी सरकारने वांगचूक यांना जेलमध्ये टाकलं आहे. त्यामुळे हा कायदा आपल्या मोडायचा आहे. मोदी सरकारने वांगचूक यांना पाकिस्तानात जाऊन आले असा आरोप केला आहे. त्यांना अटक करून जेलमध्ये टाकलं आहे. मग पंतप्रधान मोदी गुपचूप नवाज शरीफ यांच्या वाढदिवसाला पाकिस्तानात जाऊन केक खाला, त्याला काय म्हणायचं.
न्याय हक्क मागणे हा देशद्रोह होत आहे. त्यामुळे या कमलाबाईने चिखल करून ठेवला आहे. सरकार चालवण्याचं यांच सुतराम शक्य नाही. मनिपूर ३ वर्ष जळत होतं, आता कुठे मोदी तिथे गेले. मोदी तिथे गेले आणि काही तरी तोडगा काढतील. महिलांचं सांत्वन करतील. त्यांचं भाषण आलं हसावं की रडावं असं होतं. मनीपूर के नाममध्ये मनी आहे, ते आम्हाला इथंही कळतं. मनीपूरमध्ये जाऊन मनी दिसलं पण मनीपूरच्या लोकांच्या डोळ्यातलं पाणी नाही दिसतं. मग तिथे जाता कशाला?
देवेंद्र फडणवीस देशात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत दहावे
भाजप हा अमिबा झाला आहे. हे मुख्यमंत्री आम्हाला शिकवत आहे, देशातील लोकप्रिय सीएम कोण आहे, आपलं सरकार होतं तेव्हा महाराष्ट्रातील ५ मध्ये आपले सीएम होते. पण हे माझं कर्तृव्य नव्हतं ते तुमचं होतं. आता फडणवीस हे देशातील लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून १०वे आले आहे. ते येणारच होते, कामाची बजबजपुरी करून टाकली आहे. वसई विरारामध्ये अधिकाऱ्याला अटक केली. अधिकारी बॅगा उघडून ठेवले आहे. मंत्र्यांना बार आणि वाईन शॉपचे पुरावे देत आहे. फडणवीस हे मंत्र्यांना पुरावे आता मिळवून देऊ नका, असं सांगून समजूत काढत आहे.
संघाने लावलेल्या झाडाला विषारी फळं
पण मला भागवत यांना विचारायचं आहे. मुंबई पालिकेची निवडणूक तुम्ही लावाच. मुंबईच्या रस्त्याची चाळण झााली आहे. जरा कुठे पाऊस झाला तर मुंबई तुंबत आहे. मोनो रेल लटकत आहे, लोक खड्यात जात आहे. बोटी का सुरू करत नाही. ही लोक भाजपचाचा महापौर झाला पाहिजे, असं सांगत आहे. ही लोक आता हिंदू -मुसलमान वाद पेटवत आहे. धर्म आपल्या घरामध्ये ठेवा, माणूसकी हाच माझा धर्म आहे.
संघाला ब्रम्ह देव होता येत असेल पण ते ब्रम्ह देव नाही ते ब्रम्हाराक्षस झाले
जे भाजपवाले अंगावर येत आहे, तुम्ही मुंबई जिंकली तर उद्योजकांच्या पायावर समर्पण कराला, जाणवं घालाल. एक व्यापारी म्हणून तुम्ही मुंबईकडे पाहत आहात, आम्हाला हिंदूत्व शिकवू नका, पहिलं तुमच्या फडक्यावरच हिरवा रंग काढून टाका. भगवा फक्त शिवसेनेच्या हातात आहे. तुमच्या फटक्यवरचा हिरवा रंग काढा आणि मग आमच्या अंगावर या. हे चेलेचेपाटे, तुम्ही १०० वर्ष काम केली, या चेलेचेपाटे या झाडाला लागेली विषारी फळं लागली आहे. ती बधून तुमचं समाधान होत आहे का, याच साठी केला होता अटहास, पण भागवत साहेबांना सांगता येत नसेल. संघाला ब्रम्ह देव होता येत असेल पण ते ब्रम्ह देव नाही ते ब्रम्हाराक्षस झाले आहे. मी जाणीवपूर्वक हा शब्द वापरतोय.
मोहन भागवन यांनी मशिदीला भेट दिली, मुस्लिमाच्या नेत्याने मोहन भागवत यांचा राष्ट्रपिता म्हणून ओळख केली. भाजपच्या लोकांना हिंमत असेल तर जाऊन विचारा हे भारताचे म्हणाले की पाकिस्तानचे म्हणाले. आम्हाला हिंदूत्व शिकवू नका. हे एवढ्यापुरतं थांबत नाही. या देशामध्ये राहतोय तो सोफिया कुरेशी यांना पाकिस्तानाच्या बहिण म्हणताय. दुसरीकडे बिल्किस बानो यांच्यावर अत्याचार करायाचे. मोदी सांगतात मुस्लिमांच्या घरातून जेवण यायचं. एकदा जाऊन हिंदूत्व तपासून पाहायला.
तुमचा पोरगा पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळतोय, हीच का तुमची घराणेशाही?
काल परवा क्रिकेटची मॅच झाली. जो माणूस क्रिकेटच्या विजयाची तुलना युद्धासोबत करतो तो माणूस बेशरम आहे. क्रिकेट आणि पाकिस्तानसोबत . तुम्ही कशाला ऑपरेशन केलं, तुम्हीच सांगितलं हिंदू आहे हे पाहून गोळ्या झाडल्या. एक तर तुम्ही १० वर्षांपासून सत्तेत बसले आहात, हिंदू सुरक्षित नाही. एकीकडे हिंदुत्वावर बोलायचं आणि तुमचा पोरगा पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळतोय, हीच का तुमची घराणेशाही. एका बाजूला तुमची नासकी घराणेशाही दुसरीकडे आमच्या ठाकरेची घराणेशाही आहे. कशाला घराणेशाहीवर बोलताय.
पगारी मतदार व्हायचं का?
पहिले तुम्हाला संकटातून बाहेर काढावं लागणार आहे. लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे टाकले, खायला अन्न नाही, तिथे १५०० रुपये मिळाले. त्यामुळे महिलांना बरं वाटलं असेल. पण शेतकरी म्हणााला पगारी मतदार तयार करतोय, त्यामुळे महिलांनी ठरवायचं आहे, पगारी मतदार व्हायचं की स्वाभिमानी मतदार व्हायचं. आपल्याकडे एक फुल आणि दोन हाफ आहे, त्यांनी दिल्लीत जाऊन बसायला पाहिजे होतं, महाराष्ट्रासाठी मदत मागायला पाहिजे होती. बिहार निवडणुकीच्या तोंडावर १० हजार रुपये टाकतात. हा काय प्रस्ताव आला होता का, तिकडे मत घेण्यासाठी पैसे आहे. बिहारसाठी पॅकेज देत आहे, ७० हजार देऊ की, सव्वा लाख कोटी दिले आहे. सरकारकडे पैसे आहे ,पण महाराष्ट्रावर अन्याय करत आहे. महाराष्ट्रावर सूड घ्यायचा आहे.
जीएसटी काय नेहरूंनी लावला होता का?
यांना सगळ्याच गोष्टीमध्ये उत्सव साजरा करायचा आहे, जीएसटी काय नेहरूंनी लावला होता, आठ वर्ष पैसे खिश्यात घालून बसले आहे. राजेश खन्ना यांचा सिनेमा आठवतोय. हॉटेलवाले त्यांच्याकडे गेले, तिप्पट पैसे वाढवले, त्या पद्दतीने. मुंबई पालिकेची निवडणूक होऊनच जाऊ द्या, सगळ्या कामाचं श्रेय ही लोक घेत होतं, बीडीडी चाळीचं भूमिपूजन मी आणि शरद पवारांनी केली होतं. मुंबईचा कोस्टल रोड आम्ही केलं होतं, आता नाईट लाईफचा निर्णय महायुती सरकार घेत आहे. हे काम आदित्य ठाकरेंनी सुरू केलं होतं. पण भाजपच्या लोकांनी धिंगाणा घातला होता. पण मक्काऊला जाऊन ही लाईटलाईफ नाही. हे आपल्याला शिकवणार साधन सुचिता होता. आमची तर बार आणि पब बंद करा अशी आमची मागणी होती. सव्वा दोन लाख कोटी तुटीच्या पालिका टाकली आहे. यांनी तीन वर्षात खालेली पैसे बाहेर येणार आहे. आम्ही सत्तेत आल्यावर व्हाईट पेपर काढणार.
राज ठाकरे आणि मी एकत्रच!
हा सैनिका आणि शिवसैनिक आहे, तुम्ही कितीही जल्लोषात असला तरी उद्धव ठाकरे पुढचा कार्यक्रम काय देणार , उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का, अरे मग ५ जुलैला काय केलं होतं, आम्ही एखत्र आलो आहे एकत्र राहण्यासाठी जिथे मातृभाषेचा घात होईल तिथे फूट पडू देणार नाही. जाहीरपणे सांगतो, हिंदीची सक्ती आमच्यावर करायची नाही, हिंदीची सक्ती सहन करणार नाही. प्रांत रचनेनुसार प्रत्येकाला भाषा मिळाली. गुजरात, तमिळ, झारखंड ,तसा मराठी भाषेला महाराष्ट्र मिळाला. प्रत्येक राज्याला सरकार आणि राजधानी मिळाली. मुंबई रक्त सांडवून मिळवली, जर व्यापाऱ्चाच्या खिश्यात जाणार असेल तर खिशा फाडून टाकू.
आता किती मारमाऱ्याा झाल्या, कुणी हात उचलला तर हात तोडून बाजूला करेल, आाम्हाला कुणाच्या मध्ये जायचं नाही. मी आज भाजपला इशारा देतो, हिंदुत्वाच्या मुद्यावरून आममच्या अंगावर येऊ नका, नाहीतर टोप्या घातलेल्या फोटोचं प्रदर्शन लावेन. कोणत्या दिशेनं जायचं हे थोतांड आहे. बटेंगे तो कटेंगे हे कधी करायचं, हे तुमच्या नेत्यांना विचारा. मी पूर्वी बोललोय महाराष्ट्रात गो माता आणि दुसऱ्याा राज्यात जाऊन खातात.
मराठवाड्यासाठी मोर्चा काढणार
आर्यन मिश्रा नावाच्या मुलाचा पाठलाग करून गोळ्या मारल्या, त्यालाा न्याय मिळाला की नााही माहित नाही. किरण रिजूज सांगतात बिफ खातता. आता मी प्रेमाने सांगतोय. प्रत्येकवेळी आगपाखड करायची गरज नाही. तुम्हाला संधी मिळाली आहे. बाळासाहेबांचं व्यंगचित्र आठवतं जेव्हा जनता पक्ष काढला होता. त्याची आठवण तुम्हाला करून देतोय. मोरारजी देसाई अंधाऱ्या खाईत घेऊन जात आहे. त्याामुळे शिवसेनेची मशाल आपल्याला घेऊन पुढे जायची होती. २०१४ मध्ये चहाची किती किंमत होती, आता जीएसटी लागू झाल्यावर आता किती किंमत आहे. भ्रष्टाचार पे चर्चा सुरू केली पाहिजे. महााराष्ट्र सरकारला इशारा देतो शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या नाहीत महाराष्ट्र भर आंदोलन करू, मराठवाड्यात मोर्चा काढणार आहोत. एक आंदोलन झालं पाहिजे.