TRENDING:

Shiv Sena UBT On Fadnavis-Raj meeting : ''ही भेट म्हणजे...'', फडणवीस-राज भेटीवर उद्धव यांच्या निकटवर्तीयाची पहिली प्रतिक्रिया

Last Updated:

Shiv Sena UBT On Fadnavis-Raj meeting : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मास्टरस्ट्रोकमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. तर, दुसरीकडे या भेटीवर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय अनिल परब यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: मागील काही दिवसांपासून मनसे आणि ठाकरे गट एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू असताना दुसरीकडे आज मोठी घडामोड घडली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज वांद्रे येथील हॉटेल ताज लँड्स एन्ड्समध्ये भेट झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मास्टरस्ट्रोकमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. तर, दुसरीकडे या भेटीवर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय अनिल परब यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
News18
News18
advertisement

गुरुवारी सकाळी राज ठाकरे मुंबईतील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये पोहोचले. त्याच दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांचा ताफा पोहचला. त्यामुळे आज दोन्ही नेत्यांमध्ये बैठक होणार असल्याची चर्चा सुरू झाली. या चर्चांवर काही वेळेत शिक्कामोर्तब झाले. एका बाजूला शिवसेना ठाकरे गटाकडून युतीसाठी सकारात्मक भूमिका घेतली जात असताना दुसरीकडे आज राज यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीचे राज्यात पडसाद उमटू लागले आहेत.

advertisement

अनिल परब यांनी काय म्हटले?

ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी म्हटले, मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरे यांची आज भेट झाली. पण, ही भेट कशासाठी झाली, का झाली याचे तपशील अद्याप समोर आली नाही. आता, मुख्यमंत्र्यांना कोणी भेटले तर ती प्रत्येक भेट ही राजकीय भेट नसते. मुख्यमंत्र्यांना कोणीही भेटू शकतो. मात्र, आज ती भेट कशासाठी याचा तपशील समोर आल्याशिवाय भाष्य करणे योग्य नसल्याचे परब यांनी स्पष्ट केले.

advertisement

अनिल परब यांनी म्हटले की, आम्ही शिवसेनेने भूमिका जाहीर केली आहे. आम्ही मनसेसोबत युतीचा हात पुढे केला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील महाराष्ट्राच्या हिताच्या अनुषंगाने आपली भूमिका जाहीर केली आहे.

ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा...

ठाकरे बंधू बीएमसी निवडणुकीआधी एकत्र येणार अशी चर्चा जोर धरू लागली आहे. दोघांनी तसं सूचक संकेत दिल्यानंतर उद्धव ठाकरे गट आणि मनसे यांच्यातील संभाव्य युतीबाबत पडद्यामागे हालचाली सुरू झाल्या आहेत. ठाकरे गटाचे नेते युतीबाबत सकारात्मक आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात परदेशात भेट झाली होती. ठाकरे बंधूंमध्ये ही गुप्त भेट माध्यमांना चकवा देत परदेशात झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. याआधी दोन्ही ठाकरे बंधू कौटुंबिक कार्यक्रमातही एकत्र दिसले होते.

advertisement

इतर संबंधित बातमी:

BMC Elections : मुंबईतून ठाकरेंना संपवण्यासाठी संघाची फिल्डींग, BMC साठी आखला खास प्लान

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Shiv Sena UBT On Fadnavis-Raj meeting : ''ही भेट म्हणजे...'', फडणवीस-राज भेटीवर उद्धव यांच्या निकटवर्तीयाची पहिली प्रतिक्रिया
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल