उद्धव ठाकरे यांनी आज दिल्लीत प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, आज इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. मधल्या काळात इंडिया आघाडीच्या नेत्यांची व्हिडीओ कॉन्फरसिंगवर चर्चा झाली. आज पुन्हा एकदा बैठक होणार आहे. इंडिया आघाडीत आमची चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांनी उपराष्ट्रपती पदाच्या मुद्यावरही थेट भाष्य केले.
advertisement
एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा?
उपराष्ट्रपती पदाची निवडणुकीची घोषणा झाली आहे. येत्या काही दिवसांत भाजपच्या नेतृत्त्वातील एनडीए आघाडीकडून उमेदवाराची घोषणा होण्याची शक्यता आहे. भाजप-एनडीएने मराठी उमेदवार दिल्यास पाठिंबा देणार का, असा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, आधी उमेदवार जाहीर होऊ द्या, त्यानंतर पाहू असे उद्धव यांनी म्हटले. सध्या आम्ही कोणाला पाठिंबा देणार, यापेक्षा धनगड यांनी तडकाफडकी उपराष्ट्रपती पदावरून राजीनामा का दिला, सध्या ते कुठं आहेत, याची माहिती अधिक महत्त्वाची आहे. ते कुठं आहेत, हे माहित असतं तर आपण नक्कीच त्यांची भेट घेतली असती, असेही ठाकरे यांनी म्हटले.
दरम्यान, याआधीदेखील शिवसेनेने एनडीएच्या आघाडी असताना राष्ट्रपतीपदासाठी युपीएच्या उमेदवार प्रतिभा पाटील यांना मराठी व्यक्ती म्हणून पाठिंबा दिला होता. आता उपराष्ट्रपती पदासाठी भाजपने मराठी उमेदवार दिल्यास ठाकरे कोणती भूमिका घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
इतर महत्त्वाची बातमी:
‘ऑपरेशन टायगर’ची टांगती तलवार, उद्धव ठाकरेही अलर्ट मोडवर, खासदारांच्या बैठकीत काय झालं?
