आज वरळीत होणाऱ्या मेळाव्यासाठी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. मुंबईतील या मेळाव्यासाठी उपस्थित राहण्यासाठी पुणे, नाशिकसह इतर भागातूनही कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले आहेत. काही वेळेतच मेळाव्याची सुरुवात होणार आहे. आजच्या ऐतिहासिक विजयी मेळाव्यात कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आहेत.
प्रवेशद्वारावर पोलिसांशी हुज्जत, बाचाबाची...
आजच्या या विजयी मेळाव्यासाठी हजर राहण्यासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित झाले आहेत. मात्र, गेटवर कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवले असल्याचे समोर आले आहे. पोलिसांकडून सभागृहात प्रवेश देण्यास नकार दिला जात आहे. त्यामुळे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. मुंबईचे माजी महापौर महादेव देवळे, मनसे नेते प्रकाश महाजन आदींसह महत्त्वाचे नेते गर्दीत अडकले आहेत. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी गेटवर जात कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.
advertisement