मुंबई: निवडणूक मतदार यादीतील त्रुटींसह इतर काही प्रक्रियांवर आक्षेप घेत महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ निवडणूक आयुक्तांच्या भेटीसाठी दाखल झाले. राज ठाकरे देखील या शिष्टमंडळात आहेत. ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा होत असताना दुसरीकडे आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्रितपणे प्रवास करत मंत्रालय गाठले.
advertisement
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्या भेटीआधी उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्यासह मविआचे नेते ठाकरे गटाचे कार्यालय शिवालय येथे जमले. या ठिकाणी छोटी बैठक झाली. या बैठकीनंतर उद्धव आणि राज ठाकरे हे एकत्रितपणे कारमधून प्रवास केला. या वेळी ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. मंत्रालयात दाखल झाल्यानंतर राज ठाकरे यांच्या मागे उद्धव ठाकरे आणि त्यानंतर आदित्य ठाकरे चालत असल्याचे दिसून आले.
मतदारयादीसह प्रभाग रचना आणि इतर मुद्यांवरून आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम आणि मुख्य निवडणूक आयुक्त यांची भेट मविआच्या शिष्टमंडळाने घेतली. दोन वेगवेगळ्या शिष्टमंडळांकडून मुख्य निवडणूक अधिकारी आणि मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली आहे.
