शिवतिर्थावरील दसरा मेळाव्यातून राज ठाकरेंसोबतच्या युतीवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आत्ता एकाने विचारलं, राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का? मग 5 तारखेला आम्ही काय केले होते? आम्ही एकत्र आलो,असे त्यांनी सांगितले. आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी, त्याचवेळी सांगितले होते. जिथे मातृभाषेचा घात होतोय, तिथे मी मराठी माणसामध्ये फूट पडू देणार नाही. हिंदीची सक्ती होऊ देणार नाही,असा इशारा देखील उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिला होता.
advertisement
दरम्यान महायुती सरकारने हिंदी संक्तीचा निर्णय घेतल्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आक्रामक भूमिका घेतली होती. तसेच दोन्ही नेते हिंदी सक्तीच्या मुद्यावर एकत्र देखील आले होते. वरळीच्या डोममध्ये हे नेते एकत्र आले होते. बाळासाहेबांच्या मनातलं चित्र त्यावेळी व्यासपिठावर लाखो शिवसैनिक आणि मनसैनिकांनी अनूभवलं होतं. यावेळी राज ठाकरे यांनी व्यासपिठावरून जे बाळासाहेबांना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवलं आहे, असे म्हणत त्यांना टोला लगावला होता.
दरम्यान हे दोन्ही नेते असे एकत्र व्यासपीठावर येण्याआधीच महायुती सरकारने हिंदी सक्तीचा जीआर मागे घेतला होता. पण या हिंदी सक्तीने दोन्ही नेते एकत्र आले होते. पण पुढे त्यांच्या पक्षात युती होईल अशा चर्चा होत्या.पण दोन्ही नेत्यांनी मौनच बाळगलं होतं. आज दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे एक हात पुढे करतील असे वाटत होते. पण त्यांनी जून्याच घटनेचा आधार घेत आम्ही एकत्रच आलो होतो,असे म्हणत थेट युतीवर भाष्य करणे टाळले.त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीववरचा सस्पेन्स कायम राहिला आहे.