स्वच्छता म्हणजे जणू छंदच
आजोबांचं वय तब्बल 96 वर्ष आहे. या वयातही आजोबांना डोळ्यांवर साधा चष्मा सुद्धा लागलेला नाही. इतकच नाही तर आजोबा कधीही आजारी पडले नाही. औषधीच्या दुकानातून कधीच आजोबांना औषधीची गरजही पडलेली नाही. फक्त वयानुसार त्यांना ऐकायला येत नाही. त्यामुळे संभाषण करणं अवघड होतं, असं कुटुंबीय सांगतात. खरंतर आजोबांना लहानपणापासूनच स्वच्छता आवडते आणि आता तर स्वच्छता म्हणजे आजोबांचा जणू छंदच झालाय. आपल्या घरचे अंगण आणि परिसर आजोबा स्वच्छ ठेवतात.
advertisement
काय स्मरणशक्ती, काय फिटनेस, सर्व ओक्केमध्ये; नव्वदीच्या आजोबांचे छंद पाहून तरुणही चाट
आजोबांच्या आरोग्याचा फंडा
आजोबांचा आहारही अगदी साधा आहे. न पचणारे किंवा शरीराला हानिकारक असणारे पदार्थ ते खात नाहीत. तरुण वयात आजोबांनी शेतीची काम केली. म्हणजेच मेहनतीची खूप कामे केली आणि वयाच्या 96 वर्षातही आजोबांना स्वस्थ बसवतच नाही. त्यांच्या हाताला काही ना काही काम हवंच असतं, असतं असंही कुटुंबीय सांगतात.
वय वर्षे 90 तरीही आजोबांनी जपला अनोखा छंद, हे ऐकून व्हाल मंत्रमुग्ध
आजोबांपासून इतरांनी घ्यावी प्रेरणा
गावकऱ्यांकडून आजोबांचं कौतुक होतं. या वयातही आजोबांना मेहनतीची काम करण्याची आवड आहे. साहजिकच तरुण वयाप्रमाणे ते होणे शक्य नाही. मात्र आजोबा अजूनही काम करण्याचा प्रयत्न करतात. ही बाब खरंच कौतुकास्पद म्हणावी लागेल. आजोबांचं मन सकारात्मक आणि खंबीर आहे. त्यामुळेच त्यांचे शरीरही स्वस्थ आणि निरोगी आहे. आजच्या काळात प्रत्येकाने त्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी, अशीच त्यांची दिनचर्या आणि फिटनेस आहे.