वर्धा: एखाद्या कंपनीत किंवा संस्थेत काम करताना दोन प्रकारचे करार (Contractual Agreements) असतात. एक म्हणजे ते आपण पूर्णवेळ कर्मचारी म्हणून काम करतो आणि दुसरा म्हणजे कॉन्ट्रॅक्ट्चुअल म्हणून काम करतो. आजकाल अनेक कंपन्या कॉन्ट्रॅक्ट्चुअल पद्धतीने कर्मचारी घेतात. त्यात प्रॉव्हिडंट फंड वगैरे पेड होत नसतो. कॉन्ट्रॅक्टमध्ये वेगवेगळ्या सेक्शन मध्ये टीडीएस कटतो. हा टीडीएस परत मिळवता येतो. याचबाबत वर्धा येथील सनदी लेखापाल (सीए) राजेंद्र भुतडा यांच्याकडून जाणून घेऊ.
advertisement
किती कापला जातो टीडीएस?
टीडीएस किंवा टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स ही भारत सरकारद्वारे आयकर गोळा करण्याची थेट पद्धत आहे. जिथे कर्मचारी स्कील्ड नाहीये तिथे 194 C या सेक्शन नुसार टीडीएस कापला जातो. तो साधारणतः 1 टक्के असतो. दुसरा 194J ज्याला आपण प्रोफेशनल किंवा टेक्निकल सर्व्हिसेस म्हणतो, त्याला 10 टक्के कटतो. परंतु, हा कापला गेलेला टीडीएस परत मिळू शकतो, असे भुतडा सांगतात.
फ्रुट ज्यूसच्या व्यवसायातून तरुण झाला मालामाल; शेतकऱ्यांना दिली पैसे कमावण्याची संधी Video
हा पैसा परत मिळेल का ?
देशात 5 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असल्यास आयकर लागत नाही. त्यामुळे त्याच्या आतील उत्पन्न असेल तर आपण टीडीएस बाबत योग्य नियोजन करू शकतो. आपल्या पॅन कार्डला आयकर विभागाच्या वेबसाईटवर रजिस्टर करायचं. रजिस्टर करून झाल्यानंतर आपल्याला क्लेम करायचा आहे. आपण ज्या कॅटेगरीत बसतो त्या कॅटेगिरीचे इन्कम टॅक्स फॉर्म फील करून आपल्याला सबमिट करायचं असतं, असंही भुतडा सांगतात.
उन्हामुळे शरीरात आलेला थकवा कमी करण्यासाठी होईल मदत; काय आहेत आईस ॲपलचे गुणकारी फायदे? Video
या फॉर्ममध्ये टेक्निकल गोष्टी असल्यामुळे थोडासा कर सल्लागार किंवा सनदी लेखापाल यांची मदत घेतली पाहिजे. त्यामध्ये आपल्याला पूर्ण रक्कम परत कशी मिळू शकते किंवा पुढे आपल्याला याचा फायदा कसा होऊ शकतो? हे बघता येईल. इन्कम टॅक्स रिटर्न भरलं तर आपल्याला टीडीएसचा परतावा येईल. त्यासाठी एक बँक अकाउंट नंबर द्यावा लागेल. या वर्षासाठी जर आपला टॅक्स कापला असेल तो 31 जुलै 2024 च्या आधी कधीही काढता येईल. याव्यतिरिक्त आणखीही काही फायदे आपल्याला करून घेता येऊ शकतात, असेही सीए भुतडा यांनी सांगितले.