TRENDING:

भारतात नव्हे समृद्धीचा बोगदा जगात भारी; फायर झोनपासून स्प्रिंकलर...वाचा खासियत पाहून म्हणाल- ये हुई ना बात!

Last Updated:
impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गावरील शेवटचा 76 किमीचा टप्पा (इगतपुरी ते आमणे) आजपासून सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला झाला आहे. या टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोठ्या जल्लोषात पार पडले. यानंतर, 701 किमी लांबीचा पूर्ण समृद्धी महामार्ग प्रवाशांसाठी खुला झाला असून, मुंबई ते नागपूरचा प्रवास आता फक्त 8 तासांमध्ये शक्य होणार आहे.
News18
News18
advertisement

या महामार्गावरील सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे 8 किमी लांबीचा अत्याधुनिक बोगदा, जो देशातील सर्वात लांब बोगद्यांपैकी एक आहे. 17.5 मीटर रुंदीचा आणि 9 मीटर उंचीचा हा बोगदा दोन्ही बाजूंना तीन-तीन लेन असलेल्या दुहेरी टनेल प्रणालीने सज्ज आहे. यामध्ये वाहनचालकांना ताशी 100 किमीच्या वेगाने सुरक्षितपणे प्रवास करता येईल.

स्प्रिंकलर सिस्टीम तैनात

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Diwali Recipe: खमंग अन् खुसखुशीत सांगलीचा चिवडा! पाहा 1kg प्रमाणात सोपी रेसिपी
सर्व पहा

या बोगद्यात प्रथमच भारतात डेन्मार्कहून आयात केलेले स्प्रिंकलर सिस्टीम बसवले गेले आहे. तापमान 60 अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यास आपोआप पाण्याची फवारणी सुरू होते. प्रत्येक 90 मीटर अंतरावर फायर उपकरणे, तसेच 24 मीटर अंतरावर एकूण 572 फायर झोन, आणि 100 डबल अ‍ॅक्सल रिव्हर्सेबल व्हेंटिलेशन फॅन्स बसवण्यात आले आहेत, जे सतत ताजी हवा खेळती ठेवतात आणि धूर बाहेर फेकतात. बोगद्यात दर 300 मीटर अंतरावर 26 क्रॉस-पॅसेजेस तयार करण्यात आले आहेत, जे आपत्कालीन प्रसंगी प्रवाशांना सुरक्षित मार्गाने बाहेर येण्यासाठी उपयोगी ठरतात. त्याचबरोबर या महामार्गावर 32 मोठे पूल, 25 इंटरचेंज, आणि 6 किमी लांबीचे ओव्हरपास तयार करण्यात आले आहेत.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
भारतात नव्हे समृद्धीचा बोगदा जगात भारी; फायर झोनपासून स्प्रिंकलर...वाचा खासियत पाहून म्हणाल- ये हुई ना बात!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल