दहावीचा निकाल 13 मे रोजी ऑनलाइन पद्धतीने लागला आणि आता 11 प्रवेश प्रक्रिया ही केंद्रीय पद्धतीने राबवण्यात येत आहे. याआधी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ही फक्त मेट्रो सिटीत राबवण्यात येत होती. परंतु यावर्षीपासून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रमध्ये ऑनलाईन पद्धतीने राबविली जात असून नाव नोंदणी करून विविध शाखेचे प्रवेश होणार आहेत.
advertisement
सायकल मॅन प्रविणची गोष्ट! आतापर्यंत 2000 सायकलींचं विद्यार्थ्यांना केलं वाटप, कारण ऐकून कराल कौतुक
26 मेपासून 3 फेऱ्यांत प्रवेश
शासनाच्या धोरणानुसार 19 मे पासून ऑनलाईन नाव नोंदणी होणार होती. पण काही तांत्रिक अडचणीमुळे ही प्रवेश प्रक्रिया आता 26 मे पासून 9 जून पर्यंत होणार आहे. त्यात प्रथम फेरी, द्वितीय फेरी, तृतीय फेरी आणि शून्य फेरी म्हणजेच राहिलेले सर्व प्रवेश होणार आहेत. तसेच महाराष्ट्र शासनाने ज्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत त्या सर्व महाविद्यालयांना बंधनकारक असणार आहेत. त्याबाबत पालक आणि विद्यार्थ्यांना माहिती दिली जात आहे.
दरम्यान, विद्यार्थी आणि पालकांनी प्रवेश घेताना संपूर्ण माहिती घेऊनच चांगल्या कॉलेजची निवड केली पाहिजे. 10 वीनंतर अकरावीला कोणत्या शाखेत प्रवेश घ्यावा, याबाबत मुलांमध्ये गोंधळ होतो. त्यासाठी मुलांनी आपली आवड व गुणवत्ता बघून प्रवेश घेतला पाहिजे, असेही प्राचार्य गमे सांगतात.